मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेला इशारा

रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेला इशारा

Independence Day 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला संबोधित केलं. वाचा त्यांच्या भाषणातील मुद्दे.

Independence Day 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला संबोधित केलं. वाचा त्यांच्या भाषणातील मुद्दे.

Independence Day 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला संबोधित केलं. वाचा त्यांच्या भाषणातील मुद्दे.

  मुंबई, 15 ऑगस्ट: Independence Day 2021: देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2021) निमित्ताने देशभर ध्वजारोहण केलं जात आहे. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन (Red fort) तिरंगा ध्वज फडकावला. यावेळी त्यांनी जनतेला संबोधन केलं. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयातील प्रांगणात ध्वजारोहण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे. यावेळी पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तरच आपण कोरोनाला घालवू शकतो, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात उद्यापासून आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. मात्र कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही आहे. काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण निर्बंध शिथिल करतोय मात्र पुन्हा लॉकडाऊन लावावा लागू नये, यासाठी आतापासून खबरदारी घ्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे. राज्यात लसीकरणाने वेग घेतला असून काल राज्यभरात साडे नऊ लाख लोकांचं लसीकरण झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. लसीकरणात राज्याचा हा उच्चांक आहे. आपण एक निश्चय करु, मी माझं राज्य, देश कोरोनामुक्त करणारच, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेत. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशात ते कोरोनाचं संकट पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा, असं ते म्हणालेत. कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो, असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषणातले काही मुद्दे या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केला. अनेकांना कोरोनाची बाधा झाली यात काहीजण बरे झाले काही जण दुर्देवाने शहीद झाले त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो. आपण सर्वांनी निश्चय करायला हवा. स्वातंत्र्य हे असंच मिळालेलं नाही. आपल्या देशातील करोडो नागरिकांनी माझा देश स्वतंत्र झालाच पाहिजे आणि मी तो करणारच असं म्हणत लोकचळवळ उभी केली. त्यानंतर इंग्रजांनाही आपला देश सोडून जावं लागलं. हेही वाचा- Independence Day 2021: आतंकवादी बुरहान वाणीच्या वडिलांनी काश्मीरात फडकावला तिरंगा, पाहा EXCLUSIVE फोटो आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहोत. आज सगळ्यांनी निश्चय केला पाहिजे, की मी माझा देश करोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणारच ही प्रतिज्ञा आपण करुयात. जय हिंद, जय महाराष्ट्र! आज आपले हे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी होत आहे. या निमित्ताने कोरोनापासून मी माझा देश, राज्य मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार असा निश्चय करूया. आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळालं, अनेकांच्या संघर्षातून आणि संकल्पातून उभ्या राहिलेल्या लोकचळवळीने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवत आहोत. आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे. गेल्यावर्षी आणि या वर्षीही दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता काही प्रमाणात औषधं उपलब्ध झाली असली तरी ऑक्सिजनची अजूनही कमी आहे. ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Cm, Independence day, Uddhav thackeray

  पुढील बातम्या