स्वातंत्र्य दिनाआधी गडचिरोलीतून धक्कादायक बातमी! माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

स्वातंत्र्य दिनाआधी गडचिरोलीतून धक्कादायक बातमी! माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

गडचिरोलीतील कोठी गावात दुकानात खरेदीसाठी गेलेल्या जवनावर माओवाद्यांच्या टीमकडून गोळीबार करण्यात आला.

  • Share this:

गडचिरोली, 14 ऑगस्ट : स्वतंत्र्य दिनाआधी सीमेवार दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला आहे. तर दुसरीकडे गडचिरोलीतही आज सकाळी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग़डचिरोलीमध्ये माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून एक गंभीर जखमी आहे. जखमी जवानाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

गडचिरोलीतील कोठी गावात दुकानात खरेदीसाठी गेलेल्या जवनावर माओवाद्यांच्या टीमकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दुशंत नंदेश्वर जवान शहीद झाला आहे. दिनेश भोसले जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, तर 3 जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, या हल्ल्यात एक तरुणही जखमी झाला आहे. जखमींना सध्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या आसपासच्या परिसरात दहशतवाद्यांच्या शोध सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 14, 2020, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading