एकाचा पहारा तर दुसऱ्याची करामत, बाईक चोरी करताना चोरटे CCTVमध्ये झाले कैद

एकाचा पहारा तर दुसऱ्याची करामत, बाईक चोरी करताना चोरटे CCTVमध्ये झाले कैद

बसस्थानकाच्या जवळ एका घराबाहेरून बाईक चोरी करत असताना चोरट्यांच्या व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

  • Share this:

मधुकर गलांडे, इंदापूर, 23 जानेवारी : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. या परिसरात दुचाकी चोरीबरोबरच घरफोड्यादेखील वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गावातील बसस्थानकाच्या जवळ एका घराबाहेरून बाईक चोरी करत असताना चोरट्यांच्या व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

इंदापूरमधील राहुल जाधव यांच्या घराचे दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरटे दिसत आहेत. तसेच घरासमोर लावलेली दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे. गावातील फुटाणेनगर येथील दोन दुचाक्यादेखील चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. गावचे ग्रामदैवत असलेले मारुती महादेव मंदिराच्या गेटचे कुलूपही चोरट्यांनी तोडले आहे.

गावातील गावठाणासह वाड्या-वस्त्यांवर भुरट्या चोरीमध्ये देखील वाढ झालेली आहे. यामध्ये शेळ्या, मेंढ्या, बोकड ,गाईची वासरे, याबरोबरच दुचाकी, मोबाईल चोरीमध्ये वाढ झालेली आहे.

चोऱ्यांमुळे गावातील नागरिक भयभीत झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

First published: January 23, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या