डाळिंब उत्पादक शेतकरीही देशोधडीला

डाळिंब उत्पादक शेतकरीही देशोधडीला

डाळिंब लालचुटूक आहेत पण डाळिंबं घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे चेहेरे मात्र मावळलेले आहेत.

  • Share this:

मधुकर गलांडे, इंदापूर

27 एप्रिल : डाळिंब उत्पादक शेतकरी सधन समजला जातोय. मात्र डाळिंबानंही शेतकऱ्याला रडकुंडीला आणलंय. अवघ्या पाच ते वीस रुपये किलोनं डाळिंब विकला जातोय.

इंदापूरच्या बाजारातली ही लालचुटूक डाळिंबं पाहा...डाळिंब लालचुटूक आहेत पण डाळिंबं घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे चेहेरे मात्र मावळलेले आहेत. कारण या लालचुटूक डाळिंबांना अवघा पाच रुपये ते चाळीस रुपये किलो असा भाव मिळतोय.  इंदापूर डाळिंब (14)  एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये डाळिंब बागेसाठी खर्च येत असताना शेतकऱ्याच्या हातात एकरी दहा हजाराचं उत्पन्नही पडत नाही.

सरकारची धोरणं शेतकरीपुरक राहिलेली नाहीत. त्यामुळे डाळिंब निर्यात करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं व्यापारी सांगतात. परिणामी डाळिंब चवलीपवलीच्या भावात विकावे लागतायेत.

तूर, कांदा, द्राक्ष उत्पादक देशोधडीला लागलेत. आता सधन समजला जाणारा डाळिंब उत्पादक शेतकरीही देशोधडीला लागलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 10:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading