आयकराची मर्यादा 8 लाखांवर करा, शिवसेनेची मागणी

आयकराची मर्यादा 8 लाखांवर करा, शिवसेनेची मागणी

8 लाख उत्पन्न असणारे गरीब असतील तर मग त्यांच्यासाठी आयकराची मर्यादा का वाढवली जाऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 31 जानेवारी : हंगामी अर्थसंकल्पाला एक दिवस राहिलेला असताना शिवसेनेने आयकराची मर्यादा वाढविण्याची मागणी केली आहे. खासदार अनिल देसाई यांनी आज अर्थमंत्री पीयुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना मागणीचं निवेदन दिलं. अशी मर्यादा वाढवली तर त्याचा मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळेल असं शिवसेनेचं मत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली होती. त्यानंतर बैठकीची माहिती देताना खासदार संजय राऊत यांनी ही मागणी पहिल्यांदा केली होती. सरकारने खुल्या वर्गातील घटकांना 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेताना ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख आहे अशा गरीब कुटुंबांसाठी हा निर्णय लागू होणार असा सरकारचा नियम होता.

त्यावर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने ही मागणी केलीय. 8 लाख उत्पन्न असणारे गरीब असतील तर मग त्यांच्यासाठी आयकराची मर्यादा का वाढवली जाऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या मागणीवर आता अर्थमंत्री काय निर्णय घेतील हे शुक्रवारी सादर होणार अर्थसंक्लपात दिसणार आहे.

VIDEO: रेल्वेतले स्टंट कमी होते म्हणून आता थेट रेल्वे पुलावर बाईक स्टंट

First published: January 31, 2019, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading