मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalana raid : राहुल-अंजलीच्या लग्नाला आले अन् बेडखालून काढली पैशांची बंडलं, सोन्याच्या विटा अन् हिरे!

Jalana raid : राहुल-अंजलीच्या लग्नाला आले अन् बेडखालून काढली पैशांची बंडलं, सोन्याच्या विटा अन् हिरे!

 या कारवाईमध्ये 25 कापडी पिशव्यांमध्ये नोटांची बंडलं पॅक केली होती. त्यानंतर ही रक्कम स्थानिक स्टेट बँकेमध्ये नेऊन मोजण्यात आली होती.

या कारवाईमध्ये 25 कापडी पिशव्यांमध्ये नोटांची बंडलं पॅक केली होती. त्यानंतर ही रक्कम स्थानिक स्टेट बँकेमध्ये नेऊन मोजण्यात आली होती.

या कारवाईमध्ये 25 कापडी पिशव्यांमध्ये नोटांची बंडलं पॅक केली होती. त्यानंतर ही रक्कम स्थानिक स्टेट बँकेमध्ये नेऊन मोजण्यात आली होती.

    जालना, 11 ऑगस्ट : जालन्यामध्ये आयकर विभागाने छापा टाकून तब्बल 390 कोटींच्या बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला आहे. कमालीची गुप्तता पाळून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली. विशेष म्हणजे, राहुल आणि अंजलीच्या लग्नाला आल्याचे भासवून या आयकर विभागाने ही मोहीम फत्ते केली. पण, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये काहीच हाती लागले नाही. पण, जेव्हा फॉर्महाऊसवर छापा टाकला तेव्हा नोटांची बंडल सापडली. (income tax raid in jalna) महाराष्ट्रामध्ये जालना हा स्टिल उत्पादनासाठी नावाजलेला आहे. पण, आयकर विभागाने स्टिल कारखानदारांचा बेकादेशीर उद्योग चव्हाट्यावर आणला आहे. आयकर विभागाने स्टिल उत्पादन करणाऱ्या कारखानदारांच्या घर, फार्महाऊस आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छाप टाकला. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हातात मोठे घबाड लागले आहे. तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज सापडला आहे. एवढंच नाहीतर 300 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे. मागील 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होते. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली. आयकर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. आयकर विभागाने नवीन एमआयडीसी मधील 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईमध्ये तब्बल 390 कोटींची रोकड हाती लागली. ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल 16 तास लागले. जालन्यातील या चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवहारातून मिळवले आणि हे व्यवहार रोखीत केले, याची माहिती रेकॉर्डवर आणली नाही. त्यामुळे आयकर विभागाने अत्यंत गुप्तपद्धतीने हा छापा टाकला. सुरुवातीला घरात काहीच सापडले नाही! या कारखानदारांच्या घरावर, कार्यालय, फार्महाऊस छापे टाकण्यात आले होते. एकाच वेळी पाच पथकांनी कारवाई केली. सुरुवातीला पथकाच्या हाती काही लागले नाही. पण नंतर जेव्हा पथकाने शहरापासून दूर असलेल्या फॉर्महाऊसवर धाड टाकली तेव्हा घबाड हाती लागले. कपाटाखाली, बिछान्यामध्ये पैशांची बंडलं सापडली. यामध्ये तीन कारखानदारांकडे रोख रक्कम सापडली. त्याचबरोबर सोन्याचे दागिने सोन्याचे बिस्किटे, विटा, नाणी आणि हिरे मिळाले. एकूण ३२ किलो सोनं हातात लागले. एकूण सुमारे ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. तर औरंगाबादेतही दोन व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. त्यांच्याकडून ५८ कोटी रोख जप्त केली आहे. यात १६ काटींचे सोन्याचे दागिने, हिरे आढळले आहे. या कारवाईमध्ये 25 कापडी पिशव्यांमध्ये नोटांची बंडलं पॅक केली होती. त्यानंतर ही रक्कम स्थानिक स्टेट बँकेमध्ये नेऊन मोजण्यात आली होती. सकाळी ११ च्या सुमारास मोजणी सुरू केली आणि ती रात्री १ वाजता संपली होती. पैसे मोजण्यासाठी 10 ते 12 मशीन लागल्या होत्या. वऱ्हाडी बनून आले अधिकारी! विशेष म्हणजे, जालन्यात येण्याआधी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नामी शक्कल लढवली. कारवाईची कुणकुण कुणाला लागू नये म्हणून वऱ्हाडी बनून आले. लग्नासाठी असलेल्या गाड्या बूक करण्यात आल्या होत्या. आपण खरेच लग्नाला आलो आहोत, हे दाखवण्यासाठी गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकरही लावण्यात आले होते. नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्यांवर सुद्धा असे स्टिकर लावले होते. एका गाडीवर तर वर आणि वधूचे स्टिकर लावलेले होते. वराचे नाव होते राहुल तर वधूचे नाव होते अंजली... प्रत्येक अधिकाऱ्यांच्या गटाला विशेष असा कोडवर्डही दिला होता. एकूण 260 अधिकारी आणि 120 गाड्यांचा हा ताफा होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या