चंद्रपूर, 10 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठीचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपुरातील निर्माणाधीन घरी आयकर विभागाने बुधवारी छापा टाकला. मात्र या छाप्यात काहीही न सापडल्याने पथक रिकाम्या हाताने परतले. दरम्यान, या छाप्याचा काँग्रेसने निषेध केला असून, भाजप पुरस्कृत ही धाड असल्याचा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या धाडीची रीतसर परवानगी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या दडपशाहीची तक्रार आयोगाकडे करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वाचा- मोठा गौप्यस्फोट, 'उमेदवारी कापण्यासाठी भाजपने केली 20 कोटींची उलाढाल'
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशसह दिल्ली, गोवा या राज्यात आयकर विभागाने छापे टाकले होते. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सचिव आणि माजी पोलिस अधिकारी कक्कड यांचा देखील समावेश होता. या छाप्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर हल्ला केला होता. सरकारच्या सांगण्यावरून विरोधकांना घाबरवण्यासाठी निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे छापे टाकले जात असल्याची टीका विरोधकांनी केली होती.
VIDEO : 'अशा नेत्याला राष्ट्रवादीतून हाकला' ऐकताच धनंजय मुंडे पोट धरून हसले