राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाचा छापा

राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील मोठे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापा टाकला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 10:44 AM IST

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाचा छापा

कोल्हापूर, 25 जुलै : एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोमात गेली आहे. अशातच दुसरीकडे पक्षाला आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील कागल येथील मोठे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापा टाकला आहे. गुरूवारी (25 जुलै) पहाटेच्या सुमारास मुश्रीफ यांच्या निवासस्थानी, त्यांच्या मुलाच्या निवासस्थानी आणि साखर कारखान्यावर छापेमारीची कारवाई करण्यात आली.  हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातलं मोठं नाव असून शरद पवारांच्या जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात.

(पाहा : ...म्हणून गाडी सोडून चंद्रशेखर बावनकुळेंनी केली 'लोकल वारी', पाहा VIDEO)

नेमकं काय घडलं?  

हसन मुश्रीफ बुधवारी (24 जुलै) मुंबईत होते. गुरूवारी (25 जुलै) सकाळी ते आपल्या कागलमधील निवासस्थानी पोहोचले. यानंतर काही वेळात आयकर विभागाचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं. जवळपास 30 ते 40 जणांच्या पथकानं त्यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेली ही कारवाई मुश्रीफ यांना धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Loading...

(वाचा : शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलले छगन भुजबळ, म्हणाले...)

राष्ट्रवादीचे सचिन अहिर मनगटावर शिवबंधन बांधणार?

दरम्यान,  विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी कोणताही दुजोरा मिळालेला नाही. अशातच आता भुजबळ यांनीही या चर्चा फेटाळल्या आहेत. मात्र, सचिन अहिर हे आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदही बोलावली आहे. त्यामुळे सचिन अहिर आजच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील प्रमुख चेहरा होते. तसंच ते माजी मंत्रीही राहिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मुंबईत मोठी गळती लागू शकते.

(वाचा : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया)

VIDEO: शिवसेना प्रवेशाची चर्चा छगन भुजबळांनी फेटाळली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 10:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...