बलात्कार, हत्येनंतर नागपूर तापलं; हैदराबादप्रमाणे आरोपीचा एन्काऊंटर करा, नागरिकांचा संताप

कळमेश्वरमध्ये सर्व दुकान बंद करण्यात आली आहे. आरोपी संजय पुरीला आमच्या ताब्यात द्या. फाशी किंवा त्याचा एन्काऊंटर करा (हैद्राबादप्रमाणे)अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

  • Share this:

प्रशांत मोहिते, प्रतिनिधी

नागपूर, 09 डिसेंबर : नागपूर कळमेश्वरजवळ  लिंगा गावात 5 वर्षीय  चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर आज नागरिकांनी कळमेश्वर बंद पुकारला आहे. चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कळमेश्वरमध्ये सर्व दुकान बंद करण्यात आली आहे. आरोपी संजय पुरीला आमच्या ताब्यात द्या. फाशी किंवा त्याचा एन्काऊंटर करा  (हैदराबादप्रमाणे)अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

संतप्त नागरिकांनी आंदोलन करत गावात कडकडीत बंद पुकारला आहे. दरम्यान कळमेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस  तैनात करण्यात आले आहे. तेथील नागरिकांशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया चिमुकलीच्या वडिलांनी दिली आहे.

6 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या, मृतदेह फेकला शेतात

कळमेश्वर तालुक्यातील लींगा येथे 6 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी लिंगा गावाशेजारी असलेल्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. उत्तरीय तपासणीसाठी मुलीचा मृतदेह नागपूरच्या मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आला आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्रात आणखी एक बलात्काराची घटना, अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार

मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय...

हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना लींगा गावात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस त्या दिशेने तपास करत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.

काय आहे हे प्रकरण?

लिंगा या गावापासून जवळ पीडित मुलीच्या आजीचे घर आहे. मुलगी शुक्रवारी सकाळी आजीकडे जाण्यासाठी घरातून निघाली होती. ती आजीकडे गेली असेल असे समजून तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला नाही. मात्र, शनिवारी सकाळी मुलगी आजीकडे गेली नसल्याचे समजताच आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तिचा शोधा सुरू केला. आजूबाजूचा परिसर अक्षरश: पिंजून काढला. परंतु ती सापडली नाही. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गावाजवळील एका झुडपात मुलीचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला.

इतर बातम्या - मुंबई वगळता राज्यात गारठा, पुढचे काही दिवस असं असेल तापमान!

मुलीवर अत्याचार झाला की नाही याबाबत आपण आत्ताच काही सांगता येत नासल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत काही बोलता येईल, असेही पोलिसांनी म्हटलं होतं. दरम्यान, या घटनेमुळे गावात संतापाची लाट आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस लक्ष ठेवून आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading