यवतमाळमध्ये 10 लाखांची रोकड जप्त

यवतमाळमध्ये 10 लाखांची रोकड जप्त

यवतमाळमध्ये 10 लाख 80 हजाराची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

  • Share this:

यवतमाळ 17 मार्च : आंतरजिल्हा नाकाबंदीदरम्यान कारमध्ये 10 लाख 80 हजारांची रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते कोपरणा येथील रहिवासी आहेत. शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ गाडी क्रमांक एमएच 34, बीएफ 8022ची तपासणी केली. त्यावेळी गाडीत 10 लाख 80 हजार रूपये सापडले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा येथील रहिवासी असलेल्या आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. पुढील तपास वणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनोहर पर्रिकरांची प्रकृती खालावली, गोव्यात सत्ताबदलासाठी हालचालींना वेग

नाशिकमध्ये जप्त केली होती 80 लाखांची रक्कम

शुक्रवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने दोन कारवाया केल्या होत्या. यामध्ये 80 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यात केळवद, सिंरोजी आणि खुर्सापार या तीन सीमेवर सावनेर तहसील कार्यालयाने निवडणूक स्थायी तपासणी पथक नेमलं आहे. यात रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या मध्य प्रदेशातील केळवद सीमेलगतच्या पथकाला दोन गाड्या तासाभराच्या फरकात संशयास्पद आढळल्या. दोन्ही होंडा सिटी कारमध्ये प्रत्येकी 30 आणि 50 लाख रूपये अशी एकूण 80 लाख रुपयांची रक्कम आढळून आली होती. जप्त करण्यात आलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली.

शुक्रवारी (15 मार्च) दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर निवडणूक विभागाच्या पथकाला होंडा सिटी कार क्रमांक एम.एच.49 बी.बी.0801 मध्ये 30 लाख रुपये रोख रक्कम आढळली. तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सौसर येथून येणाऱ्या निळ्या रंगाच्या होंडा सिटी कारची तपासणी केली असता, कारच्या डिक्कीत पांढऱ्या-गुलाबी रंगाची नायलॉनची पशू आहाराची बॅग सापडली. या बॅगमध्ये एकूण 30 लाखांची रोख रक्कम आढळून आली होती.

तो स्टार्ट करणार तेवढ्यात बाईकने घेतला पेट; घटनेचा LIVE VIDEO

First published: March 17, 2019, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading