मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नको ते धाडस जिवावर बेतले, ST बस पुलावरून वाहून गेली; चालकासह 4 जणांचा मृत्यू

नको ते धाडस जिवावर बेतले, ST बस पुलावरून वाहून गेली; चालकासह 4 जणांचा मृत्यू


यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) उमरखेड (Umerkhed) शहरापासून काही अंतरावर आज सकाळी ही दुर्घटना घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) उमरखेड (Umerkhed) शहरापासून काही अंतरावर आज सकाळी ही दुर्घटना घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) उमरखेड (Umerkhed) शहरापासून काही अंतरावर आज सकाळी ही दुर्घटना घडली.

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 28 सप्टेंबर :  समोर नाल्याला पूर दिसत असतानाही एसटी बस (st bus) पाण्यातून नेण्याचा अट्टहास जीवावर बेतला आहे. नागपूरहून (nagpur ) नांदेडकडे (nanded) जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बस (hirkani bus) आज सकाळी पाण्यात वाहून गेली होती. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचविण्यात यश आले असून क्रेनच्या च्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) उमरखेड (Umerkhed) शहरापासून काही अंतरावर आज सकाळी ही दुर्घटना घडली. नांदेडहुन नागपूरसाठी निघालेली बस दाहगाव जवळच्या नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली यात चालक आणि वाहक यांच्यासह 4 जणांचा मृत्यू झाला आहे.  मृतकांमध्ये बसचा चालक, वाहक आणि दोन प्रवाशांचा समावेश आहे.  चालकाचे नाव सुरेश सुरेवार, तर  वाहकाचे भीमराव नागरिकर आहे.

IPL 2021: CSK ची जर्सी घालण्यासाठी एका नवऱ्याची तळमळ; फोटो होतोय व्हायरल

आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घाटरोड आगराची बस नांदेडहुन नागपूरला जात असताना उमरखेड जवळच्या दाहगाव नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नाल्यात कोसळली.

पाण्याचा वेग एवढा होता की, काही कळायच्या आतच बस धारेत लागली आणि 50 मीटर अंतरावर असलेल्या झाडाला अडकली. बसमधील प्रवाशांना गावकऱ्यांनी पुरात उड्या घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. 6 पैकी दोघांना वाचविण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. क्रेनच्या साह्याने बस काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र पाऊसचा जोर कायम असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

महापौरांच्या आईलाही सेल्फीची भुरळ; लेकासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल

गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत.

First published:
top videos