काय सांगता! 'या' गावात कर भरणाऱ्याला दिली जाते सोन्याची अंगठी

काय सांगता! 'या' गावात कर भरणाऱ्याला दिली जाते सोन्याची अंगठी

सोन्याची अंगठी मिळवण्यासाठी गावकरी करांचा भरणा करत असल्यानं ग्रामपंचायतीची तिजोरी भरली जाणार आहे.

  • Share this:

आसिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 26 डिसेंबर : ग्रामपंचायत असो अथवा महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर कर वसूलीचं नेहमीच मोठं आव्हान असतं. कर वसूली होत नसल्यानं त्याचा विकासकामांवर परिणाम होतो. मात्र, राज्यातली एक ग्रामपंचायत याला अपवाद ठरली आहे.

सोन्याच्या दागिन्यांचं सर्वांनाच आकर्षण असतं. मात्र, या आकर्षणाचा फायदा आता सांगली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीनं करून घेतलाय. वांगी गावची लोकसंख्या ही 9 हजारच्या आसपास आहे.  गाव मोठं असल्यानं कराचा आकडा देखील मोठा. दरवर्षी एकूण 65 लाखाच्या आसपास करवसुली होते. मात्र, करवसुलीचं हे प्रमाण अवघं 30 टक्केच आहे. त्यामुळे करवसुलीसाठी सुवर्ण बक्षीस योजना जाहीर करण्यात आली.

घरपट्टी, पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची बक्षीसं ठेवण्यात आली आहेत. सोन्याच्या अंगठ्या बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत.  15 मार्च 2020 पर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांच्या नावांच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. लकी ड्रा करून विजेत्यांची नावं जाहीर केली जाणार आहेत.

सोन्याची अंगठी मिळवण्यासाठी गावकरी करांचा भरणा करत असल्यानं ग्रामपंचायतीची तिजोरी भरली जाणार आहे. त्याचा गावाच्या विकासासाठी उपयोग होणार आहे. आणि त्यातच सोन्याची अंगठी मिळणार असल्यानं गावकरीही भरणा करायला प्राधान्य देताना दिसत आहेत.

कर्जमाफीचे ग्रँड सेलिब्रेशन.. शिवसेनेने शेतकऱ्यांना साखर वाटून तोंड केलं गोड

कर्जमाफीचे ग्रँड सेलिब्रेशन करत माजलगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना साखर वाटप करत तोंड गोड करण्यात आले. या अभियानाला 'वचनपूर्ती' असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीची माहिती देण्यासाठी कर्जमाफी जणजागृती रथाची निर्मिती करण्यात आली. माजलगाव तालुक्यातील मोटेवाडी गावातून बुधवारी या आभार अभियानाला सुरुवात झाली. यावेळी मोठय़ा संख्येने गावातील शेतकरी उपस्थिती होते. गावात रथ येताच हलगी आणि फटक्याची आतषबाजी करत स्वागत केले. कर्जमाफी झाल्यामुळे आता खरी दिवाळी साजरी करत आहोत, अशा भावना महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारचे आभार मानले. प्रत्येक शेतकऱ्यांला उद्धव ठाकरे साहेबांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानायचे मात्र जावू शकणार नाहीत, म्हणून हे आभाराचे पत्र देत आहोत असेे शेतकऱ्यांनी सांगितले.

मोटेवाडी गावात दुष्काळात काही पिकले नव्हते कर्ज फेडण्याची चिंता होती. माझ्याकडे 1 लाख 80 हजार कर्ज आहे. ते फेडणे होणार की नाही अशी चिंता वाटत होती. त्यात कुटुंबातील खर्च, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी पैसे नव्हते. मात्र, आता कर्जमाफी झाल्याने माझा मुलगा शिकू शकणार आहे. मला बँकेचे पैसे भरावे लागणार नाहीत, असे भरत पास्टे या शेतकऱ्यांने सांगितले. तसेच ठाकरे सरकारचे आभारही मानले.

दुष्काळाने पीडित शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला होता तो त्यांनी पाळला. या बाबतीत शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. अटी शर्ती विना महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफी यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही. यासाठी हे अभियान सुरु केले आहे. तसेच ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीचे आभार मानण्यासाठी माजलगाव तालुक्यातून एक लाख आभार पत्र व शुभेच्छा पत्र पाठवणार असल्याचे माजलगावचे शिवसेना प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2019 07:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading