आश्चर्याचा धक्का! 'सेल्फी' प्रकरणी एकनाथ खडसे धावले महाजनांच्या मदतीला

Movie: Eknath Khadse,Girish Mahajan,Kolhapur Flood,Maharashtra Flood
Rating:
Actor: Eknath Khadse,Girish Mahajan,Kolhapur Flood,Maharashtra Flood
Director:

आश्चर्याचा धक्का! 'सेल्फी' प्रकरणी एकनाथ खडसे धावले महाजनांच्या मदतीला

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही गिरीश महाजन यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. महाजन आणि खडसे यांच्यात तसं राजकीय सख्य नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

  • Share this:

राजेश भागवत,जळगाव 11 ऑगस्ट : कोल्हापूर सांगलीच्या महापूरात मदत कार्यासाठी गेलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी प्रकरणामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यावर महाजनांनी स्पष्टीकरण दिलं आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांचा बचाव केला. आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही गिरीश महाजन यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.  महाजन आणि खडसे यांच्यात तसं राजकीय सख्य नाही. महाजनांना पुढे करायचं असल्यामुळेच आपला पत्ता कापला असं एकनाथ खडसेंना वाटतं. तसं त्यांनी अप्रत्यक्षरित्या अनेकदा बोलूनही दाखवलं. त्यामुळे खडसे यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापुरात घडू शकते अनुचित घटना? जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून जिल्हा बंदीचे आदेश

एकनाथ खडसे हे कायम महाजनांना टोले लगावत असतात. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी महाजनांचा केलेला बचाव विशेष समजला जातो. आपल्यावर झालेल्या आरोपांचा हवाला देत त्यांनी गिरीश महाजनांचा बचाव केला. खडसे म्हणाले, कोल्हापूर सांगली सातारच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाजन यांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी मदत पोहोचविली. एवढाच काय तर स्वतःही पाण्यात उतरून पूरग्रस्तांना वाचविण्यात पुढाकार घेतला. मात्र महाजन यांनी केलेल्या मदती पेक्षा माध्यमांनी त्यांच्या सेल्फीला प्राधान्य देत त्यांच्यावर टीका केली.

VIDEO : 'ए... चूप बसायचं', पूरग्रस्तावर चंद्रकांत पाटलांची अरेरावी

माध्यमांच्या या टीकेचा आपल्यालाही फटका बसला आहे. आपण केलेल्या चांगल्या कामापेक्षा दाऊदच्या बायकोशी आपले संबंध असल्याचं जास्त पसरविलं गेलं. माध्यमांनी कोणत्याही वृत्ताची खात्री करूनच ते प्रसिद्ध करावं आणि आपली विश्वासार्हता वाढवायला हवी असं खडसे यांनी म्हटलंय. टीआरपीच्या नादात माध्यमांनी आपण केलेली विधाने तोडमोड करून दाखविल्याचा आरोप देखील खडसे यांनी केलाय. पाचोरा  तालुक्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 12, 2019, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading