Home /News /maharashtra /

शिवसेना राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत, संजय राऊतांच्या उपस्थितीत भाजपला बसणार हादरा?

शिवसेना राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत, संजय राऊतांच्या उपस्थितीत भाजपला बसणार हादरा?

संजय राऊत हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या उपस्थितीमध्ये भाजपातील दोन बडे नेते शिवसेनच्या तंबूत येण्याची शक्यता आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 05 जानेवारी : ईडीच्या (ED) नोटीस प्रकरणावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) सामना सुरू आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेना आता भाजपला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजपचे दोन मोठे नेते सेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या उपस्थितीमध्ये भाजपातील दोन बडे नेते शिवसेनच्या तंबूत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेत येणारे दोनही नेते भाजपाचे प्रदेशउपाध्यक्ष आहे. त्यामुळे  संजय राऊत यांच्या दौऱ्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मुलींच्या शिक्षणासाठी 'या' राज्य सरकारचा अनोखा उपक्रम, दररोज मिळणार 100 रुपये मागील महिन्यात 21 डिसेंबर रोजी माजी आमदार बाळासाहेब सानप(Balasaheb Sanap)  यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का मानला जात होता. परंतु, सानप यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे भाजपमध्येच फूट पडल्याचे पाहण्यास मिळाले होते. ऑरगॅनिक शेती करुन शेतकऱ्याने मिळवलं लाखोंचं उत्पन्न भाजपमधील अनेक नेत्यांनी सानप यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देऊ नये अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती.  पण, सर्वांचा विरोध डावलून सानप यांना पक्षात घेण्यात आले होते. सानप यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. सानप यांच्या भाजप प्रवेशाचा बदला घेण्यासाठी आता शिवसेनेनं रणनीती आखली आले आहे. त्यामुळे गुरुवारी नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपचे कोणते नेते सेनेत प्रवेश करता याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या