पालघरमध्ये प्रचारसभांची रणधुमाळी, उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ रिंगणात

पालघर लोकसभा पोट निवडणूकांत जस जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसा निवडणूक प्रचारही जोर धरू लागला आहे. आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी पक्षातील नेतेही आता प्रचाराच्या रिंगणात उतरताना दिसतायत.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 23, 2018 11:08 AM IST

पालघरमध्ये प्रचारसभांची रणधुमाळी, उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ रिंगणात

पालघर, 23 मे : पालघर लोकसभा पोट निवडणूकांत जस जसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसा निवडणूक प्रचारही जोर धरू लागला आहे. आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी पक्षातील नेतेही आता प्रचाराच्या रिंगणात उतरताना दिसतायत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत. त्यांची सभा आज संध्याकाळी 5 वाजता वसंत नगरी ग्राउंड वसई पूर्व येथे होणार आहे.

तर भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित केली आहे. योगी आदित्यनाथ यांची सभा आज संध्याकाळी 6 वाजता मनवेलपाडा तलाव विरार पूर्व याठिकाणी होणार आहे. काँग्रेसने देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचारात उतरवलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आज दुपारी दीड वाजता मंगल कार्यालय वीर सावरकरनगर नारंगी पूर्व याठिकाणी सभा घेणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत तर योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी ही प्रचारसभा घेत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.

सर्वच पक्षांसाठी ही पोट निवडणूक चुरशीची असली तरी तरी शिवसेना आणि भाजपने मात्र ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधन झाल्याने पालघरमध्ये ही पोट निवडणूक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2018 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...