अनिस शेख, मावळ 29 जुलै : मावळ तालुक्यातील आढेगावात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असतानाच आकाशातून दोन आगीचे गोळे पडत असल्याचं दिसल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नेमके हे आगीचे गोळे कशाचे होते याचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही. त्यामुळे आढे गावातील ग्रामस्थ मात्र या घटनेने चांगलेच धास्तावले आहेत.
काही तरुणांनी आकाशातून आगीचे गोळे पडत असल्याचं पाहिलं. त्यांनी गावातल्या काही लोकांना याची माहिती दिली आणि सर्व गावात ही माहिती पसरली. सध्या आला तर प्रचंड पाऊस नाही तर कोरड ठक्क, कधी विजांचा कडकडाट तर कधी प्रचंड वारा येत असल्याने नागरिकांना नेमकं काय होतंय तेच कळत नाहीये.
काही उत्साही तरुणांनी गावच्या परिसरातले डोंगर पालथे घालून गोळे कुठे पडलेत का याची शोध घेतला मात्र त्याचे पुरावे आढळले नाहीत. प्रशासनालाही याची कल्पना देण्यात आली आहे. मात्र नेमकं कशाचा शोध घ्यायचा असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडलाय. त्यामुळे आकाशातून पडणाऱ्या आगीच्या गोळ्याबाबतचं रहस्य अद्यापही कायमच आहे.
नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार, सर्वच नगरसेवक घेणार हातात 'कमळ'
पुन्हा मुसळधार पावसाचा धोका
मुंबई आणि कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस उसंत घेण्याची काही शक्यता नाही. पुढचे चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढचे पाच दिवस रायगड आणि कोकणात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबई आणि ठाणे परिसरातही मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. या सोबतच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही दमदार पाऊस होईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.
अमित शहांच्या रथातूनच निघणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, असा आहे रथ!
गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. उष्माही प्रचंड प्रमाणात वाढला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा परतला आहे. मुंबईजवळच्या कर्जत आणि वांगणी परिसरात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस झाल्याने उल्हास नदी ओव्हर फ्लो झाली होती. त्यामुळे हा परिसर पूर्ण पाण्याने वेढला होता. त्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्याने NDRF आणि नौदलालाही पाचारण करण्यात आलं होतं. एक्सप्रेसमधल्या 1 हजारांपेक्षा जास्त लोकांना बचाव पथकाने बाहेर काढलं होतं.