24 तासांतील महाराष्ट्र पोलिसांतील बाधितांचा धक्कादायक आकडा; दिवसेंदिवस वाढतेय संख्या

24 तासांतील महाराष्ट्र पोलिसांतील बाधितांचा धक्कादायक आकडा; दिवसेंदिवस वाढतेय संख्या

गेल्या 24 तासांत 2 पोलिसांचा मृत्यू झाला आहे

  • Share this:

मुंबई, 29 जून : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोना योद्ध्यांमध्येही लागण होण्याची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्र पोलिसातील बाधितांची संख्या 77 पर्यंत पोहोचली असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

राज्याची सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्यांना कोरोनाची बाधा होत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत राज्यातील 1030 जणांना कोरोनाची लागण झाली असून 59 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या चिंता वाढवणारी आहे.

हे वाचा-BREAKING महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत Lockdown वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय

दुसरीकडे वाढती रुग्णसंख्या पाहता रेड झोनमधील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्यात अद्यापही कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणता आलेलं नाही, यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 2 लाख 10 हजार 120 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनामधून आतापर्यंत 16 हजार 475 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 3 लाख 21 हजार 722 रूग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: June 29, 2020, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading