मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गावकरी ते राव काय करी, गावातील रुग्णांसाठी उभारले कोविड सेंटर!

गावकरी ते राव काय करी, गावातील रुग्णांसाठी उभारले कोविड सेंटर!

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील हनुमान विद्यालयातील वर्ग खोल्यात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील हनुमान विद्यालयातील वर्ग खोल्यात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील हनुमान विद्यालयातील वर्ग खोल्यात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

सोलापूर, 24 एप्रिल : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) तुटवडा जाणवत आहे. तर ग्रामीण भागात रुग्णांना बेड मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सोलापूर (Solapur)जिल्हातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीने आपल्या गावातील रुग्णांसाठी स्वखर्चाने कोविड सेंटर (Covid center) उभारून या कठीण काळात आदर्श निर्माण केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे. उपचारासाठी असलेले दवाखाने अपुरे पडू लागले आहेत. अशातच तांदुळवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत आपल्या गावातच कोविड केअर सेंटर उभा केलं आहे.

अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयचं धाडसत्र; NCP म्हणते 'केंद्र सरकारची ही जुनी खेळी'

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. उपचारासाठी असलेले हॉस्पिटल्समधील बेड अपुरे पडत आहेत. उपचाराअभावी अनेक रुग्णाची अवस्था गंभीर होत आहे.

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील हनुमान विद्यालयातील वर्ग खोल्यात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. गावात सध्या 27 जणांना संसर्ग झाला आहे. पण खबरदारी म्हणून गावातच अशा रुग्णांवर उपचार झाले तर त्यांची मानसिकता चांगली राहणार आहे.

दारूची तहान सॅनिटायझरनं भागवली; यवतमाळमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

हे सेंटर तयार करण्यासाठी माळशिरसमधील आरोग्य विभागाने मदत केली आहे. गावा-गावात जर अशी उपचार केंद्र सुरू करता आली तर आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असं सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील यांनी म्हटलं आहे.

गावातच कोविड सेंटर उभं करण्यात आल्यामुळे रुग्णांना मोठा आदर निर्माण झाला आहे. गावात कुणाला कोरोनाची लागण झाली तर इतर संसर्ग होऊ नये म्हणून कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.

First published: