लेकाला अग्नी देणाऱ्या बापाने दिली होती ठार मारण्याची सुपारी!

लेकाला अग्नी देणाऱ्या बापाने दिली होती ठार मारण्याची सुपारी!

18 दिवसांआधी कुंभारी गावाजवळ एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. स्थानिकांनी तरुणाला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

  • Share this:

सोलापूर, 15 फेब्रुवारी : बाप-लेकाचं नात म्हणजे खास मैत्रीचं नातं असतं पण याच नात्याचा निर्घृण खून झाल्याची गंभीर घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. सोलापूरमध्ये बापाने पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना घडली आहे. 29 जानेवारीला एका तरुणाचा मृतदेह कुभारी गावाजवळ सापडला होता. या तरुणाची पित्याकडूनच  सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 दिवसांआधी कुंभारी गावाजवळ एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. स्थानिकांनी तरुणाला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण पोलिसांना हत्येचा संशय आला. कारण, मुलाच्या गळ्यावर मारल्याच्या खुणा होत्या. यावरून पोलिसांनी पुढील तपास केला आणि संशयाची सुई मृत तरुणाच्या वडिलांवर येऊन थांबली. तपासाच्या खोलवर गेल्यानंतर वडिलांनी पोटच्या गोळ्याला संपवण्याची सुपारी दिली असल्याचं उघड झालं.

इतर बातम्या - Coronavirus कहर! दर 10 मिनिटाला होतोय एकाचा मृत्यू, 1532 लोकांनी सोडला जीव

तरुण घरात रोज त्रास द्यायचा. जमिन नावावर करण्यासाठी तो रोज वडिलांशी भांडायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी शेताच्या शेजारी राहणाऱ्या मित्रांना सांगून मुलाला कायमचं संपवण्याची सुपारी दिली. 2 लाखांची सुपारी दिली असल्याची कबुली आरोपी वडिलांनी पोलिसांसमोर दिली आहे. शंकर वर्जे, राहुल राठोड, संजय राठोड अशा तिघांनी सुपारी दिली होती.

इतर बातम्या - घरातलं लग्न ठरलं शेवटचं! वऱ्हाडी बसची कंटेनरला भीषण धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी हत्येचा शोध लावत आरोपी पिता आणि इतर तिघांना ताब्यात घेतलं असून 17 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, ज्या वडिलांनी मुलाला अखेरचा अग्नी दिला त्याच पित्याने मुलाची सुपारी दिली होती. या घटनेचा उलगडा झाल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - सत्ता गमावल्यानंतर भाजपचा नवा अध्याय, नवी मुंबईत तयार होणार नवी रणनीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading