मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पोलिसांची मोठी कारवाई, एकत्र नमाज पठणासाठी गेलेल्या शेकडो नागरिकांना घेतलं ताब्यात

पोलिसांची मोठी कारवाई, एकत्र नमाज पठणासाठी गेलेल्या शेकडो नागरिकांना घेतलं ताब्यात

संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे करण्यात आला आहे. पण तरीदेखील नागरिक नियम मोडून एकत्र येतात.

संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे करण्यात आला आहे. पण तरीदेखील नागरिक नियम मोडून एकत्र येतात.

संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे करण्यात आला आहे. पण तरीदेखील नागरिक नियम मोडून एकत्र येतात.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 03 एप्रिल : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी असतानाही सामुदायिक नमाज पठण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर, धुळे आणि सांगलीत कारवाई करते अनेकांना ताब्यात घेतले आहे. सोलापुरात 70 जणांना घेतलं ताब्यात... नमाज पठणासाठी जमा झालेल्या 70हून अधिक लोकांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. भवानी पेठेतील चिराग अली मश्जिदमध्ये सामूहिक नमाज पडण्यासाठी गेले होते. जोडभावी पेठ पोलीस स्टेशनने या नागरिकांवर मोठी कारवाई केली आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे करण्यात आला आहे. पण तरीदेखील नागरिक नियम मोडून एकत्र येतात. मिळालेल्या माहितीनुसार, नमाज पडण्यासाठी गेलेल्यांमध्ये लहानग्यांचाही समावेश होता. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे तब्बल 70हून अधिक लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, धुळ्यातही असाच प्रकार समोर आला आहे. एकत्र नमाज पठणासाठी गेलेल्या 36 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नरेंद्र मोदींच्या सकाळच्या व्हिडिओ मेसेजनंतर लोकांनी Google वर शोधलं Dada Kondke धुळ्यातील ख्वाजाची छडी मशीद भागात लोक नमाज पठणासाठी एकत्र आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आझाद नगर पोलीस पुढील प्रक्रिया करत आहे. तबलिगी समाजातील कोरोना रुग्णांचा कहर, नर्ससमोरच बदलले कपडे दरम्यान, तबलिगी समाजातील कोरोना संशयित खालच्या पातळीवर उतले आहेत. एकीकडे डॉक्टर आणि परिचारिकांसह सर्व आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. दुसरीकडे तबलिगी समाजातील कोरोना संशयित खालच्या पातळीवर उतले आहेत. गाझियाबादच्या एमएमजीमध्ये दाखल झालेली जमती रुग्णालयातील कर्मचार्‍यांना सतत शिवीगाळ करीत आहे. इतकेच नाही तर या लोकांनी परिचारिकांसमोर कपडे बदलण्याचा प्रकार केला. आता जिल्हा प्रशासन तुरूंगातील बॅरेकमध्ये या लोकांना बंद करण्याचा विचार करीत आहे. हॉस्पिटलचे सीएमएल रवींद्र राणा म्हणाले की तबलिगी जमातशी संबंधित कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले आहे, पण त्यांची वागणूक खूपच चुकीची आहे. रवींद्र राणा म्हणाले की, हे लोक सातत्याने अश्लील कृत्य करीत आहे. रुग्णालयातील कर्मचार्‍यांशी गैरवर्तन करतात, परिचारिकांसमोर कपडे बदलतात आणि छोट्या छोट्या बोलण्यावरून गडबड करतात. सलाम! दगडफेकीत जखमी होऊनही महिला डॉक्टर दुसऱ्याच दिवशी परतल्या ड्यूटीवर संचारबंदी असतानाही मिरजेत सामुदायिक नमाज पठण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 40 ते 45 मुस्लिम धार्मिय लोकांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील तबलीगी जमाताचा मुद्दा गाजत असताना संचारबंदी आदेश धाब्यावर बसवून सामुदायिक नमाज पठण करण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. कोरोना आपत्ती पाश्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदी लागू असल्याने कोरोना व्हायरस संक्रमण होवू नये यासाठी शासनाने गर्दी करणारे कार्यक्रम,धार्मिक विधी वर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत ही सामूहिक नमाज पठण करण्याचा प्रकार मिरजेत घडला आहे. शहरातील बरकत मशीद येथे शुक्रवारची नमाज पठण करण्यासाठी एकत्रित आले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारून या ठिकाणी नमाज पठण करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेतले आहे. कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी नगरपंचायतने हाती घेतला अनोखा उपक्रम बरकत मशीद येथे नमाज पठण करणाऱ्या बिहारी मौलानाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोरोना आपत्ती पार्श्वभूमीवर वर मुस्लिम बांधवांनी कोरोना प्रतिबंध उपाय योजना म्हणून सामूहिक नमाज पठण करू नये,असे घरामध्ये नमाज पठण करावे असे , प्रशासनाने मुस्लिम बांधवांना वारंवार आवाहन केले होते.तरी ही शासनाच्या आदेशाला डावलून हे लोक सामुदायिक नमाज पठण करीत होते.या सर्वांच्यावर मिरज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. तर दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलीग जमाताचा मुद्दा गाजत असताना,आणि संचारबंदी आदेश धाब्यावर बसवून सामुदायिक नमाज पठण करण्याच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे .  
First published:

Tags: Corona, Coronavirus symptoms

पुढील बातम्या