मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sangli : धक्कादायक! सांगलीतील तीन शेतमजुरांचा विषारी द्रव पिल्याने मृत्यू

Sangli : धक्कादायक! सांगलीतील तीन शेतमजुरांचा विषारी द्रव पिल्याने मृत्यू

सांगली जिल्ह्यातील तीन शेतमजुरांचा आंध्रप्रदेशमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Sangli)

सांगली जिल्ह्यातील तीन शेतमजुरांचा आंध्रप्रदेशमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Sangli)

सांगली जिल्ह्यातील तीन शेतमजुरांचा आंध्रप्रदेशमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Sangli)

सांगली, 20 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातील तीन शेतमजुरांचा आंध्रप्रदेशमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Sangli) दरम्यान नशेसाठी म्हणून अल्कोहोल मिश्रित विषारी द्रव पिल्याने तीन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे घडली. हे तिघे तासगाव तालुक्यातील सावळज व सिद्धेवाडी येथील आहेत. सदाशिव सदाकळे (वय 43), दीपक जयसिंग शिरतोडे (वय 44, दोघे रा. सावळज) व भरत नामदेव चव्हाण (वय 42, रा. सिद्धे वाडी) अशी तिघांची नावे आहेत.

सांगलीचे तीन शेतमजूर आंध्रप्रदेशमधील एका द्राक्ष व्यापाऱ्याकडे कामासाठी होते. सदाशिव, दीपक व भरत हे तिघे शेतमजूर म्हणून काम करतात. अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे एका द्राक्ष व्यापाऱ्याकडे त्यांच्या शेतात बऱ्याच दिवसांपासून काम करतात. दरम्यान द्राक्ष व्यापाऱ्यांने त्यांना त्यांच्यासाठी निवाराही दिला होता. मागच्या दोन दिवसांपूर्वी तिघेही दारू पिण्यासाठी म्हणून अल्कोहोल मिश्रित विषारी द्रव पिले असल्याचे समजते. हे द्रव पिल्यानंतर काही तासात त्या तिघांची प्रकृती बिघडली.

हे ही वाचा : कोल्हापूरच्या बोगस अधिकाऱ्याने नोकरीचे अमिष दाखवत पुण्याच्या तरूणांना लाखोंना घातला गंडा

शेतातील घरात त्या तिघांशिवाय कोणी नव्हते. त्यांची तब्येत बिघडू लागली. परंतु त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. या घटनेची माहिती मिळताच द्राक्ष व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जावून पाहिले. त्यावेळी भरत चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. इतर दोघांची प्रकृती गंभीर बनली होती. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेची माहिती गुरुवारी रात्री उशिरा मृताच्या कुटुंबियांना समजली. एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने सावळज, सिद्धेवाडी परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी या तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 'इतर राज्याप्रमाणे आर्थिक मदत करा', राष्ट्रकुल पदकविजेत्या अविनाश साबळेंच्या आई-वडिलांची सरकारकडं मागणी

मेहुण्याने भाऊजीला संपवले

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात सासच्यांनी जावयाला जिवे मारल्याची घटना समोर आली आहे. (Sangli crime) पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. सांगली जिल्ह्यातील बोरगाव (ता. वाळवा) येथील विजय तानाजी जाधव (वय 35, रा. शिवाजीनगर) या जावयाचा उपचारादरम्यान गुरुवारी काल (दि.18) मृत्यू झाला.

दरम्यान विजय यांच्यावर मागच्या 18 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. मारहाणीचा हा प्रकार शनिवार, (दि. 30) जुलै रोजी घडला होता. जाधव यांच्यावर कराड येथे उपचार सुरू होते. याप्रकरणी विजय यांचे सासरे मधुकर आनंद कवठेकर, सासू राजश्री, मेहुणा प्रशांत (सर्व रा. शिवाजीनगर) यांच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान विजय यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

First published:

Tags: Sangali, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news