Home /News /maharashtra /

Sangli Crime : सांगली हादरलं! लग्नानंतर सहाव्या दिवशी माहेरी आली अन् प्रियकरासोबत विष घेऊन केली आत्महत्या

Sangli Crime : सांगली हादरलं! लग्नानंतर सहाव्या दिवशी माहेरी आली अन् प्रियकरासोबत विष घेऊन केली आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात (sangli district) प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

  सांगली, 07 जून : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात (sangli district) प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या (SUICIDE) केल्याचे समोर आले आहे. जत तालुक्यातल्या एकुंडी येथे नवविवाहित तरुणी आणि त्याच्या प्रियकर लक्ष्मण संभाजी शिंदे (वय 22) व नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी (वय 21) यांनी टोकाचे पाऊल उचलत सकाळच्या सुमारास हे कृत्य केले. यामुळे जत तालुक्यासह सांगली जिल्हा हादरला आहे. (Sangli Crime)

  लक्ष्मण शिंदे व अश्विनी माळी या दोघांचे मागच्या काही काळापासून एकमेकांवर प्रेम होते. मात्र, एक सहा दिवसांपूर्वी म्हणजे 1 जून रोजी अश्विनीचा विवाह मिरज तालुक्यातील सलगरे येथील एका तरुणाशी झाला होता. दरम्यान अश्विनीचे दुसऱ्यावर प्रेम असल्याने तिला हा विवाह पसंत नव्हता.

  हे ही वाचा : Sidhu Moose Wala Murder: गोळ्या झाडणाऱ्या 8 शूटर्सची ओळख पटली, नावे आली समोर; चाहता म्हणून रेकी करणाराही अटकेत

  यामुळे लक्ष्मण आणि अश्विनी या दोघांनीही आपापल्या घरामध्ये सकाळच्या सुमारास विषप्राशन करुन आत्महत्या केली. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते, त्यातूनच त्यांनी आपले जीवन संपवल्याची चर्चा गावात सुरू आहे. 

  जत तालुक्यातील एकुंडी या गावी 5 दिवसानंतर ती आली होती. काल सोमवारी या दोघांनीही आपापल्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. त्यापूर्वी फोन करून हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दोघांच्याही घरच्या लोकांना लक्षात येताच त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद जत पोलिसात झाली असून तपास पोलीस करीत आहेत.

  हे ही वाचा : विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेकडून दोन नावे निश्चित झाल्याची माहिती, सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी?

  सांगली जिह्यात 24 तासांच दुसरी घटना
  अनैतिक संबंधातून चंद्रकांत उत्तम हेगडे ( वय 29, रा. नवीन वसाहत, टिंबर एरिया, सांगली) या तरुणास चाकूने भोसकण्यात आले. सांगली- कर्नाळ रस्त्यावर म्हसोबा मंदिरजवळ रविवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. हेगडे याला भोसकताच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अंधार असल्याने तो मृत होऊन पडला आहे, असा समज करून हल्लेखोर पसार झाले. ते जाताच हेगडेने रक्तबंबाळ अवस्थेत भीतीने स्वत: दुचाकीवरून एकटाच नांद्रेपर्यंत प्रवास केला. तेथील दर्ग्याजवळ तो पडला. हा प्रकार पाहून काही ग्रामस्थ त्याच्या मदतीसाठी धावले. त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तो बचावला. याप्रकरणी समीर नदाफ, अमित भिसे व अल्ताफ नदाफ (सर्व रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) या तीन हल्लेखोरांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी चंद्रकांत हेगडे हा सोमवारी दुपारी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.
  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Crime news, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news, Suicide

  पुढील बातम्या