पुण्यात 47 वाहनांचे सिटकव्हर्स ब्लेडने फाडले

सहकारनगर परिसरातील विणकर सभागृहाजवळील रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक रहिवाशांची वाहने पार्क केलेली असतात.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2017 07:06 PM IST

पुण्यात 47 वाहनांचे सिटकव्हर्स ब्लेडने फाडले

27 डिसेंबर : पुण्याच्या वारजे परिसरातील बापूजी बुवा चौकात उभ्या केलेल्या 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्याची घटना ताजी असतानाच आता सहकारनगर परिसरातील तळजाई वसाहतीत जवळपास 47 दुचाकी वाहनांचे सिटकव्हर ब्लेडने फाडल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय.

सहकारनगर परिसरातील विणकर सभागृहाजवळील रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक रहिवाशांची वाहने पार्क केलेली असतात. आज सकाळी 47 वाहनांचे सिटकव्हर ब्लेडने फाडून नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामध्ये दोन रिक्षांचादेखील समावेश आहे. रहिवाशांनी सहकारनगर पोलीस आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या परिसरात सतत होणाऱ्या अशा घटनांमध्ये नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 07:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...