वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून परभणीतील शेतकरी कन्येची आत्महत्या

वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून परभणीतील शेतकरी कन्येची आत्महत्या

6 दिवसांपूर्वी काकांनी केलेल्या आत्महत्येनंतर पुतणीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरीच्या जवळा झुटा इथे घडलीय.

  • Share this:

10 आॅगस्ट : परभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. शिवाय आता शेतकरी कुटुंबातील सदस्यही आत्महत्या करत आहेत. 6 दिवसांपूर्वी काकांनी केलेल्या आत्महत्येनंतर पुतणीनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाथरीच्या जवळा झुटा इथे घडलीय.

3 ऑगस्ट रोजी पाथरीत जवळा झुटा इथले शेतकरी चंडिकादास झुटे यांनी कर्ज, पाऊस नसल्याने हातातून गेलेली पीक परिस्थिती यामुळे आत्महत्या केली होती. या घटनेच्या 6 दिवसानंतर चंडिकादास यांची 17 वर्षाच्या पुतणी सारिकानं एक चिठ्ठी  लिहून आत्महत्या केलीय, ज्यात तिने घरावर ओढवलेली सर्व परिस्थिती लिहिलीय.

मुलीच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज फेडून न शकल्यानं चंडिकादास यांनी आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

सारिकानं काय लिहिलंय पत्रात?

प्रिय पप्पा,

आपल्या भाऊंनी पाच-सहा दिवसांपूर्वी शेतातील सर्व पीक जळून गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा...त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करू नयेत यामुळे मी माझे जीवन संपवते.

तुमची सारिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading