रस्त्याअभावी आजारी आईला कावडीत घालून गाठलं रुग्णालय

रस्त्याअभावी आजारी आईला कावडीत घालून गाठलं रुग्णालय

या माणसांची दशा बघा. पायाखालचा रस्ता बघा. जगण्यासाठीची धडपड बघा. बघा कुठे दिसतोय का विकास?

  • Share this:

महेश तिवारी, 22 आॅक्टोबर : आपल्या म्हाताऱ्या आजारी आईला कावडीत घालून दवाखान्यात नेण्यासाठी धडपडणाऱ्या या मुलाला श्रावणबाळ म्हणून त्याचं उदात्तीकरण करणं हा आपला पाताळयंत्रीपणा ठरेल.  छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमेवरच्या कानगुडा भागातील काळीज पिळवटून टाकणारी ही दृश्यं. ही दृश्यं आपल्या व्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडणारी आहेत.  आदिवासी परिसराच्या मागासलेपणाचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.

या माणसांची दशा बघा. पायाखालचा रस्ता बघा. जगण्यासाठीची धडपड बघा. बघा कुठे दिसतोय का विकास? सध्या ज्या विकासावरून सत्ताधारी आणि विरोधकांची देशभरात व्हर्च्युअल लढाई सुरू आहे तो विकास कदाचित शहरात दिसत असावा. पण स्वातंत्र्याच्या 70 वर्षात विकासानं आदिवासींच्या या मातीत अजून जन्मही घेतलेला नाही.

त्रेतायुगापासून जन्मणारा श्रावण इथं आजही आईला जगवण्यासाठी धडपडतोय हे अभिमानास्पद नाही तर आपल्या व्यवस्थेसाठी लांच्छनास्पद आहे.

First published: October 22, 2017, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading