नवरात्रोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी

नवरात्रोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी

आधी अंबाबाईच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली होती

  • Share this:

कोल्हापूर- ०३ ऑक्टोबर २०१८-  केरळच्या शबरीमला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले असताना पश्चिम महाराष्ट्र मंदिर समितीनं मात्र नवा निर्णय घेतला. तोकड्या कपड्यातील भाविकांना अंबाबाईसह ३ हजार मंदिरांमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात येणार आहे. आता नवरात्रोत्सवाच्या काळात केवळ पारंपरिक वेशातच महिला आणि पुरुष भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी अंबाबाईच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारण्यावरुन मोठा वाद झाला. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र आता या नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा नवा वाद सुरू होण्याची चिन्हं दिसत आहेत.

आधी अंबाबाईच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली होती. पण मोठा विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यासाठी मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. आता हा नवा निर्णय पुन्हा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाने कोल्हापुरात वादाला नवा विषय मिळाला आहे. भाविकांचा विरोध पाहता पश्चिम महाराष्ट्र मंदिर समिती आपला निर्णय बदलणार का हा मोठा प्रश्न आहे.

नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीनेच घेतला महिलेचा जीव

First published: October 3, 2018, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading