शाळेत बागडणाऱ्या किड्यांचा मुलांना चावा, 75 मुलं हॉस्पिटलमध्ये

सर्व मुलांची प्रकृती उत्तम असून प्राथमीक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 06:17 PM IST

शाळेत बागडणाऱ्या किड्यांचा मुलांना चावा, 75 मुलं हॉस्पिटलमध्ये

प्रशांत बाग, नाशिक 29 ऑगस्ट : शाळेत कायम मुलचं बागडतात असं आपला समज आहे. मात्र शाळेत बागडणाऱ्या किड्यांमुळे मुलांनाच त्रास झाल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. शहरातल्या एका शाळेत मुलांचं अंग खाजायला लागलं आणि त्यांना चक्करही येऊ लागल्या. त्यामुळे शाळेत एकच धावपळ उडाली. त्यामुळे त्यांना दवाखाण्यात भरती करण्यात आलं. सर्व मुलांची प्रकृती उत्तम असून प्राथमीक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र सुरूवातीला मुलांना चांगलाच त्रास झाल्यानं मुलं घाबरून गेली.

पुन्हा होणार राजकीय 'भूकंप', हे 5 दिग्गज नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमधल्या बोरगड इथल्या एका शाळेत हा प्रकार घडला. पावसाळी वातावरणामुळे या दिवसांमध्ये किटकांचं प्रमाण जास्त असतं. त्यात शाळेच्या परिसरात झाडं जास्त असली तर ते प्रमाण जास्त वाढतं. मुलं नेहमीप्रमाणं शाळेत आली होती. प्रार्थनेनंतर वर्ग सुरू होताच काही मुलांचं अंग खाजायला लागलं. मुलांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र नंतर अंग खाजणाऱ्या मुलांची संख्या वाढायला लागली.

हळू हळू एकाच वर्गातल्या नाही तर अन्य वर्गातल्या मुलांचं अंगही खाजायला लागलं. काही मुलांना चक्करही येत होती. त्यामुळे शिक्षकांना हा वेगळाच प्रकार असल्याचं लक्षात आलं. शाळेने तातडीने सर्व मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत सर्व मुलांना धीर दिला. ज्यांना चकरा येत होत्या त्या मुलांना सलाईन लावण्यात आलं.

पुण्यातल्या जागावाटपावरून 'युती'त पडणार ठिणगी? सर्वच जागांवर भाजपचा दावा

Loading...

तर इतर मुलांवर गोळ्या आणि औषधोपचार करण्यात आले. काही किडे चावल्यामुळे अ‍ॅलर्जी झाली आणि मुलांना त्रास झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. काळजीचं कुठलंही कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शाळा व्यवस्थापनाने स्वच्छतेची जास्त काळजी घ्यावी अशी मागणी पालकांनी केलीय. वातावरणातल्या बदलांमुळे निसर्गात काही बदल होतात त्यामुळे काही विषारी किटक तयार होऊ शकतात त्याचा हा परिणाम असू शकतो असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 29, 2019 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...