मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /होमवर्क करत नाही म्हणून मुख्याध्यापिकेनं केली बेदम मारहाण

होमवर्क करत नाही म्हणून मुख्याध्यापिकेनं केली बेदम मारहाण

होम वर्क करत नाही, अक्षर चांगलं नाही या कारणा वरून नाशिकमध्ये एका मुख्यध्यापिकेनं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

होम वर्क करत नाही, अक्षर चांगलं नाही या कारणा वरून नाशिकमध्ये एका मुख्यध्यापिकेनं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

होम वर्क करत नाही, अक्षर चांगलं नाही या कारणा वरून नाशिकमध्ये एका मुख्यध्यापिकेनं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

    कपिल भास्कर, नाशिक, 07 फेब्रुवारी : होम वर्क करत नाही, अक्षर चांगलं नाही या कारणावरून नाशिकमध्ये एका मुख्याध्यापिकेनं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नाशिकरोड पोलिसांनी या मुख्याध्यापिकेला ताब्यात घेतलं आहे.

    चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील धाक, त्यांच्यावर घडलेल्या प्रसंगाची आठवण करून देणारा आहे. नाशिकरोडच्या एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कुलमधील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका जयश्री रोडे हिनं होम वर्क करत नाही तसचं इतर कारण देत काठीने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलांच्या हाता पायाला जखमा झाल्या असून त्यांना चालणं देखील कठीण झालं आहे.

    या आधी देखील या शाळेत फी वेळेवर दिली नाही, अक्षरं चागली नाही म्हणून मुख्याध्यापिकेकडून विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहे. मात्र या वेळेस पालकांनी धाडस दाखवत या मुख्याध्यापिके विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नाशिक रोड पोलिसांनी या मुख्याध्यापिकेला ताब्यात घेतलंय.

    याविषयी शाळा प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता या घटनेबाबत त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. एकूणच हजारो रुपये फी घेणाऱ्या या खाजगी शाळांची मुजोरी कधी थांबणार असा प्रश्न सर्व सामान्य पालक विचारतोय.

    First published:

    Tags: Hitting, Nashik, Principal, Student, अक्षर चांगलं नाही, जखमी, नाशिक, मारहाण, मुख्यध्यापिका, विद्यार्थी, होम वर्क