अवघ्या 17 दिवसांत राजकारणात एन्ट्री, थेट बसले आमदराच्या खुर्चीवर!

अवघ्या 17 दिवसांत राजकारणात एन्ट्री, थेट बसले आमदराच्या खुर्चीवर!

क्या बात है! राजकारणात सक्रिय नसतांनादेखील आमदार झाले तेही 17 दिवसांत

  • Share this:

मुजिब शेख, प्रतिनिधी

नांदेड, 25 ऑक्टोबर : राजकारणात कधी कोणाचं नशीब उजळेल हे सांगता येत नाही. नांदेडमध्येही मोहन हंबर्डे हे राजकारणात सक्रिय नसतांनादेखील आमदार झाले. तेही 17 दिवसांत. मोहन हंबर्डे यांना काँग्रेसने दक्षिण नांदेडमधून उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. 4 सप्टेंबरला त्यांनी अर्ज दाखल केला आणि 24 सप्टेंबरला ते आमदार झाले.

मोहन हंबर्डे यांचे सख्खे भाऊ संतुक हंबर्डे हे भाजपाचे महानगराध्यक्ष होते. मागील 5 वर्षांपासून त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. पण ही जागा शिवसेनेला सुटली आणि संतुक हंबर्डे यांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले. मात्र ध्यानीमनी नसतांना मोहन हंबर्डे हे 17 दिवसांत आमदार झाले. दक्षिणमधून काँग्रेसकडे अनेकांनी उमेदवारी मागीतली होती. पण काँग्रेसला नवा चेहरा हवा होता.

हंबर्डे कुटूंबाचा नांदेड ग्रामीणमध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे. तेव्हा याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचं काँग्रेसने ठरवलं. मोहन हंबर्डे यांनी निवडणूक लढवन्याचा आग्रह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. त्यामुळे मोहन हंबर्डे तयार झाले. काँग्रेससाठी मोहन हंबर्डे नवखे असल्याने ते पराभूत होतील असं वाटत होतं. शिवाय या मतदारसंघात शिवसेनेच्या राजश्री पाटील, एमआयएम, वंचित आणि अपक्ष त्यांचे तगडे आव्हान हंबर्डें पुढे होते. पण त्यांना नांदेडकरांनी साथ दिली. अत्यंत अटीतटीच्या लढाईत मोहन हंबर्डे तीन हजार पाचशे मतांनी विजयी झाले. हंबर्डे यांच्या यशाप्रमाणे अशाच एका उमेदवाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

VIDEO: बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा लेक जिंकला आमदारकी, मुलाचा बहुमान पाहून मातेला अश्रू अनावर

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशात चर्चा आहे ती चंद्रपूरचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांची. बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या मातेच्या लेकराने आमदारकी जिंकल्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अगदी हालाकीचे दिवस काढत आता विधानसभेत जागा मिळवल्यामुळे जोरगेवार यांनी सगळ्यांचे आभार मानले. यावेळी आपल्या लेकराला मिळालेला बहुमान पाहून आईचा उर भरून आला आणि त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबले नाहीत.

जेव्हा जोरगेवार हे विजयी झाल्यानंतर लोकांनी ढोल-ताश्यामध्ये त्यांच्या विजयाची मिरवणूक काढली. त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेचा आपल्या लेकराप्रती बहुमान पाहिल्यानंतर जोरगेवार यांच्या आईला अश्रू अनावर झाले. यानंतर जोरगेवार यांनी आपल्या गळ्यातले सगळे हार काढत आईच्या गळ्यात घातले आणि विजयाचं सगळं श्रेय आईला दिलं. हा प्रसंग पाहिल्यानंतर तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. जोरगेवार यांच्या विजयाचं सर्व स्थरातून कौतूक होत आहे.

चंद्रपूर मतदारसंघातमध्ये अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार भाजप उमेदवाराचा पराभव करत 73 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. आपल्या मुलाचा हा विजय पाहून आईचा उर भरून आला. आईच्या डोळ्यांतील आनंदाचे अश्रू पाहिल्यानंतर जोरगेवारदेखील भाऊक झाले. त्यांच्या यशाचं सर्व श्रेय त्यांनी आईला दिलं आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी आईचा आशीर्वाद घेतला. खरंतर जोरगेवार हे दलित समाजातील आहेत. आपल्या अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी हा विजय मिळवला.

जोरगेवार यांच्या आई चंद्रपूर शहरातील गांधी चौकात बांबूच्या टोपल्या विकतात. अगदी हालाकित्या काळात त्यांनी त्यांच्या लेकराला मोठं केलं. त्यामुळेच कदाचित लेकाराचा बहुमान पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. इतर लोकही जोरगेवार यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतूक करत आहेत.

दरम्यान, तब्बल 73 हजार मतांच्या फरकाने विजय जोरगेवार यांनी विजय मिळवला आहे. 2014च्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं. पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. नंतर त्यांनी शिवसेनेच्या मदतीने निवडणूक लढवली. तेव्हा त्यांना काही मतांनी पराभव पत्कारावा लागला. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तिथेही त्यांना तिकीट देण्यासाठी नकार देण्यात आला. त्यामुळे अखेर त्यांनी अपक्ष उभं राहून निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 07:04 AM IST

ताज्या बातम्या