• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • अरेरे, अवघ्या 2 मतांनी राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत, भाजप उमेदवार नाचत घरी गेला!

अरेरे, अवघ्या 2 मतांनी राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत, भाजप उमेदवार नाचत घरी गेला!

या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागेवर निवडणूक जिंकता आली. त्यांनी या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते.

या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागेवर निवडणूक जिंकता आली. त्यांनी या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते.

या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागेवर निवडणूक जिंकता आली. त्यांनी या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते.

 • Share this:
  नागपूर, 06 ऑक्टोबर : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीचे (Zilla Parishad and Panchayat Samiti by-elections) निकाल जवळपास जाहीर झाले आहे. काही ठिकाणी धक्कादायक तर काही ठिकाणी आश्चर्यकारक निर्णय लागले आहे. नागपूरमधील (nagpur) नरखेडमध्ये भाजपचा (bjp) एक उमेदवार अवघ्या दोन मतांची विजयी झाला आहे. राष्ट्रवादीच्या (ncp) उमेदवाराचा पराभव केला आहे. नरखेड तालुक्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीकडे असलेली सावरगाव पंचायत समितीमध्ये भाजपाच्या स्वप्निल नागापूरे यांनी अवघ्या 2 मतांनी खेचून नेली आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या सतीश शिंदे यांच्यामुळे राष्ट्रवादीला मोठा झटका लागला आहे. जिल्हापरिषदमध्ये सावरगावमध्ये भाजपचे पार्वताबाई काळबांडे 167 मतांनी विजयी झाल्या आहेत. VIDEO - मेहुण्यांनी रस्ता अडवून दिला त्रास; वैतागलेला नवरदेव छतावरच चढला आणि... या ठिकाणी फेर मतमोजणी घेण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती. त्यानंतर फेर मतमोजणी घेण्यात आली होती. पण सावरगाव सर्कल मध्यल्या निकालानंतर कुठलाच फरक नाही. डबल मतमोजणीमध्ये भाजपनेच विजय मिळवला. तर दुसरीकडे, आज लागलेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूक निकालांमध्ये काँग्रेसने दोन जागा वाढवत आपली सत्ता आणखी मजबूत केली आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण 16 उमेदवार अपात्र ठरवण्यात आले होते. काँग्रेसचे 7, शेकापचा 1, भाजपचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 असे एकूण 16 उमेदवार पात्र झाले होते. आज लागलेल्या निकालात 16 पैकी काँग्रेसने 9 जागेवर यश मिळवलं आपली सत्ता आणखी मजबूत केली. त्यामुळे भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जागा कमी झाल्या आहेत. Lakhimpur Kheri Case : सचिन पायलट यांनाही अडवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागेवर निवडणूक जिंकता आली. त्यांनी या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत सर्वात जास्त फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आल्या आहेत. अनिल देशमुख मतदार संघापासून दूर असल्याने त्यांना याचा फटका बसला. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसला याच मतदारसंघात चार उमेदवार होते.
  Published by:sachin Salve
  First published: