मंत्रालयात शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई कुटुंबानं नाकारली

मंत्रालयात शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई कुटुंबानं नाकारली

आम्हाला आमच्या हक्काची झाडांची मोजणी आणि जमिनीचा मोबदला मिळावा अशी भूमिका धर्मा पाटील यांच्या मुलाने घेतली आहे. याबाबत आज मंत्रालयात बैठक होतेय.

  • Share this:

24 जानेवारी : मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आणि सौर ऊर्जा प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्याला 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारी ऊर्जा विभागाने दाखवली. पण ही मदत धर्मा पाटील यांच्या कुटुंबाने नाकारली. आम्हाला आमच्या हक्काची झाडांची मोजणी आणि जमिनीचा मोबदला मिळावा अशी भूमिका धर्मा पाटील यांच्या मुलाने घेतली आहे. याबाबत आज मंत्रालयात बैठक होतेय.

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या 80 वर्षाच्या शेतकऱ्याने काल विष पिऊन मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले.

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्या बाबत धर्मा पाटील यांनी गेले तीन महिन्यापासून  पाठपुरावा सुरू केला होता.मात्र त्यांना लवकर भरपाई मिळू न शकल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

First published: January 24, 2018, 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading