महाराष्ट्र तापला, अनेक शहरांमध्ये पार केली चाळीशी

महाराष्ट्र तापला, अनेक शहरांमध्ये पार केली चाळीशी

गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून, शुक्रवारी राज्यातील अनेक शहरांचं तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याने काहिली वाढली आहे.

  • Share this:

15  एप्रिल : गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून, शुक्रवारी राज्यातील अनेक शहरांचं तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याने काहिली वाढली आहे. अकोला सर्वाधिक 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपुरात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

सौराष्ट्र, कच्छ भागात उष्णतेची लाट कायम असून, तिथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढलं आहे.  गुजरात, पश्चिम राजस्थान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

First Published: Apr 15, 2017 09:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading