मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आम्हाला ज्यांनी धोका दिला त्यांना आम्ही फोडलं, शिवसेनेच्या सद्यस्थितीवर भाजप नेते सुशील मोदींचं मोठं वक्तव्य

आम्हाला ज्यांनी धोका दिला त्यांना आम्ही फोडलं, शिवसेनेच्या सद्यस्थितीवर भाजप नेते सुशील मोदींचं मोठं वक्तव्य

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना फोडलं असं मोठं वक्तव्य सुशील मोदी यांनी केलं.

    मुंबई, 10 ऑगस्ट : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणलं. भाजपसोबत हातमिळवणी करत शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र या संपूर्ण पॉलिटिकल ड्रामा सुरु असताना भाजपने सावध भूमिका घेतली. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीला पक्षातील अंतर्गत वाद, पक्षनेतृत्व जबाबदार असल्याचं भाजपकडून सातत्याने सांगितलं जात होतं. मात्र बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना फोडलं असं मोठं वक्तव्य सुशील मोदी यांनी केलं. भाजपला बाजूला करत नितीश कुमार यांनी आरजेडी सोबत हातमिळवणी करत सत्तांतर केलं आहे. या सर्व घडामोडींवर सुशील मोदी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, आरजेडीसोबत भाजपमध्ये असताना नितीश कुमार यांना मिळणारा आदर मिळणार नाही. भाजपकडे जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला असून त्याचे परिणाम भोगावे लागले. अशाप्रकारने नितीश कुमार यांनाही सुशील मोदी यांनी इशाला दिला. भाजपने सेनेसोबतही असंच केलं, म्हणत शरद पवारांनी केलं नितीशकुमारांचं कौतुक भाजप ज्या शिडीवरुन चढतात त्याच शिडीला लाथ मारतात भाजपने इंग्रजांची निती धरली आहे. ते ज्या शिडीवरुन चढतात त्याच शिडीला लाथ मारतात. बिहारमध्ये नितीश कुमार यांना त्रास देणे सुरु होते जसं इथं शिवसेनेला करत होते. त्यामुळे नितीश कुमार यांच्या एका मंत्र्यानं राजीनामा दिला होता. मात्र महाराष्ट्रातील परिस्थितीवरुन नितीश कुमार शहाणे झाले. भाजपचा कट लक्षात आल्याने नितीश कुमार यांनी त्यांचा डाव उधळला, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना अनुभवाचा सल्ला, म्हणाले... भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो भाजप आपल्या असलेल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो. शिवसेना-भाजप एकत्र होते. सेनेत दुरी कशी करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली आणि सेनेवर आघात केला. नितीश कुमार  यांनी उचलेले पाऊल हे शहानपणाचे आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं समर्थनं केलं.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: BJP, Eknath Shinde, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या