कोल्हापुरात पेट्रोलिंगच्या सायकली धूळ खात

कोल्हापुरात पेट्रोलिंगच्या सायकली धूळ खात

2 महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हा पोलीसप्रमुखांच्या हस्तेच या सायकलींना हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. पण काही दिवसातच हा उपक्रम बारगळला आणि सायकलींची जागा पोलीस ठाण्याच्या एका कोपऱ्यात, एखाद्या खोलीत निर्माण झाली.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर,03 आॅगस्ट : ह्या अडगळीतल्या सायकली पाहून तुम्हाला वाटेल की ही एखाद्या पार्किंगची जागा आहे. पण नाही. त्यातच तुम्हाला वाटेल की या सायकली सर्वसामान्य नागरिकांच्या आहेत. पण नाही. या सायकली आहेत कोल्हापूर पोलिसांच्या. होय, विश्वास नाही ना बसत. मुंबई शहराप्रमाणं कोल्हापूरमध्ये पोलीस दलाच्या वतीनं सायकल पेट्रोलिंग हा उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला आणि 2 महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हा पोलीसप्रमुखांच्या हस्तेच या सायकलींना हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. पण काही दिवसातच हा उपक्रम बारगळला आणि सायकलींची जागा पोलीस ठाण्याच्या एका कोपऱ्यात, एखाद्या खोलीत निर्माण झाली.

विशेष म्हणजे चोरीची सत्रं रोखण्यासाठी पोलिसांनी हे पेट्रोलिंग सुरू केलं होतं.कोल्हापूर शहरातल्या 4 पोलीस ठाण्यांना या सायकली देण्यात आल्या होत्या. आता त्यावर बसलेली धुळंच सांगतेय की या सायकलींचा कितपत वापर झाला ते. पण पोलीस अधिकारी मात्र हे मान्य करायला तयार नाहीयत.

आमच्याकडून पेट्रोलिंग सुरू असल्याचं अधिकारी सांगताहेत. पण कोल्हापूरच्या रस्त्यावर मात्र एकही सायकल आणि पोलीस गस्त घालताना दिसत नाही. गर्दी असलेल्या रस्त्यांवर दिवसा आणि रात्री या सायकलवरून गस्त घातली जाईल असं उद्घाटनाच्या वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.कोल्हापूरमध्ये या सायकली आल्या खऱ्या मात्र चोऱ्यांचं प्रमाण आजही जैसे थेच आहे.तसंच आजही शहरातल्या कोणत्याही रस्त्यावर सायकल पेट्रोलिंग दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 03:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading