कोल्हापुरात मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसली, 2 ठार,5 जखमी

कोल्हापुरात मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसली, 2 ठार,5 जखमी

शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे हा अपघात झालाय. घटनेनंतर संतप्त जमावाने केएमटी बसवर हल्ला चढवलाय.

  • Share this:

संदीप राजगोळकर,कोल्हापूर, 01 आॅक्टोबर : कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसलीय आणि या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय. रविवारी रात्री म्हणजेच काही वेळापूर्वी हा अपघात झालाय. शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे हा अपघात झालाय. घटनेनंतर संतप्त जमावाने केएमटी बसवर हल्ला चढवलाय.

या घटनेने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून संतप्त जमावाने बस जाळण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दलाच्या गाडीवरही दगडफेक केलीय. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बस खाली सापडून २ जण ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झालेत.

कोल्हापूर शहरात ताबूत विसर्जन मिरवणूक होती.  या मिरवणुकीतील काही पंजे वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीकडे निघाले होते. त्याचवेळी शिवाजी चौकाकडून गंगावेशकडे निघालेल्या केएमटी बसचा ब्रेक निकामी होऊन हा अपघात घडलाय.

दरम्यान या भागातील परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानं जलद कृती दलाचे दोन तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 08:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading