कोल्हापूरमध्ये संततधार, 30 गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूरमध्ये संततधार, 30 गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले तब्बल 31 बंधारे हे पाण्याखाली गेलेत.

  • Share this:

संदीप राजगोळकर, 19 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातले तब्बल 31 बंधारे हे पाण्याखाली गेलेत. परिणामी जवळपास 30 गावांचा संपर्क तुटलाय.

गेल्या पंधरवड्यात कोल्हापूरमध्ये पावसानं दडी मारली होती. पण आता जोरदार पाऊस सुरु झाल्यानं बळीराजा सुखावलाय. पंचगंगा नदीचं पाणी मध्यरात्री पात्राबाहेर आलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गगनबावडा, चंदगडमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून आजरा, शाहूवाडी भागातही जोरदार पाऊस सुरु आहे. सध्या जिल्ह्यातली वाहतूक काही प्रमाणात सुरऴीत सुरु असली तरी काही मार्ग हे बंद झालेत.

ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला असून भरपावसातंही शेतीच्या शिवारांमध्ये कामं सुरु आहेत. दरम्यान सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर असून बेळगावला पाणीपुरवठा करणारे राकसकोप धरणही 75 टक्के भरलंय. तर सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ होत असून चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होतेय.

त्यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये जर पावसाचा जोर कायम राहिला तर कोल्हापूरसह सांगली आणि सीमाभागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading