चिपळूण, 27 जुलै : कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचा अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी (governor bhagat singh koshyari) आज रत्नागिरीतील (ratangiri) पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पण, अवघ्या अर्ध्या तासात राज्यपालांनी चिपळूण दौरा आटोपला आणि परतीच्या मार्गावर रवाना झाले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळी तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार होते. त्यानंतर त्यांनी चिपळूण शहराची पाहणी केली. यावेळी,त्यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम आदी उपस्थित होते.
IND vs ENG : कृणालला कोरोना, पण इंग्लंडमधल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण...
त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. चिपळूण शहराची अवघ्या अर्धातासात त्यांनी पाहणी केली. त्यानंतर लगेच दौरा आटोपून राज्यपाल भगतसिंग कोशारी परतीच्या मार्गावर रवाना घाले. दौरा आटोपून राज्यपाल आता मुंबईकडे रवाना झाले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर ही दुर्दैवी वेळ आली आहे, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, असे राज्यपालांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत सूचना दिल्या.
WhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा? या टिप्स वापरुन राहा टेन्शन फ्री
'मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे, असंही राज्यपालांनी यावेळी सांगितले.
'या आढावा बैठकीत राज्यपालांनी प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदतकार्य याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पूरपरिस्थिती व प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती राज्यपाल महोदयांना दिली. त्याचप्रमाणे सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली. हे मदत कार्य असेच सुरू राहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकास शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी, अशा सूचना यावेळी राज्यपालांनी केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.