खंडेरायाच्या 'मर्दानी दसरा' सोहळ्याची सांगता

खंडेरायाच्या 'मर्दानी दसरा' सोहळ्याची सांगता

15 तासांपेक्षाही जास्त काळ चालणारा जेजुरीचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत येत असतात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत, फटाक्यांच्या आतषबाजीत या मर्दानी दसऱ्याला सुरुवात करण्यात आली.

  • Share this:

अद्वैत मेहता, 01 आॅक्टोबर : महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्धतीने “मर्दानी दसऱ्याचे” आयोजन करण्यात येते, तब्बल 15  तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या  गडावर संपन्न होत असतो. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोलंघनाला गेल्यानंतर सुरू झालेला मर्दानी दसऱ्याचा आज खंडा तलवारीचे मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर समारोप झाला. राज्यातील लाखो भाविक मर्दानी दसऱ्यासाठी खंडेरायाच्या गडावर दाखल झाले होते. अनेक वर्षापासून  चालू असलेल्या ४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क झाले.

येळकोट येळकोट ! जय मल्हार ! जल्लोष आणि भंडार्‍याच्या मुक्त उधळणीत उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्‍या खंडेरायाच्या जेजुरीचे, उभ्या महाराष्ट्रत जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला “मर्दानी दसरा” म्हणून ओळखले जाते. खंडेरायाचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत आधीच दाखल होतात. जेजुरीकर सुद्धा वर्षभर कुठेही असले तरी “दसऱ्यानिमित्त” गडावर येऊन सोहळ्यात सहभागी होतच असतात.

पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर रंगतात ते म्हणजे मर्दानी खेळांची स्पर्धा. 12 वर्षापासून ते  60 वर्षापर्यंत भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात. तब्बल ४२ किलोंची असणारी एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची  आणि दाताने उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धाच या ठिकाणी रंगते. ४२ किलो वजन असणारी ही खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली ,तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या  दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलली जाते, अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात

First published: October 1, 2017, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading