पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या सहा मुली बुडाल्या, तिघींचा मृत्यू

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या सहा मुली बुडाल्या, तिघींचा मृत्यू

पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात घडली आहे. कपडे धुण्यासाठी गावातील 15 ते 17 वयोगटातील सहा मुली तलावाकडे गेल्या.

  • Share this:

20 मे : पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात घडली आहे. कपडे धुण्यासाठी गावातील 15 ते 17 वयोगटातील सहा मुली तलावाकडे गेल्या. मात्र धुणं धुतल्यानंतर या सहाही मुली लतावातील पाण्यात पोहू लागल्या.

तलावात खधानी असल्यानं या सहाही मुली खधानीतील गाळात अडकल्या. ही बाब तलावात पोहणाऱ्या गावातील मुलांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात फक्त तिघींचा मृत्यू झाला आहे.

घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली इथल्या लघुसिंचन तलावात आज सकाळी 11वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गावातील 15 ते 17 वयोगटातील सहा मुली तलावाकडे गेल्या होत्या. धुणं धुतल्यानंतर या सहाही मुली तलावातील पाण्यात पोहू लागल्या.

सोमित्रा दत्ता रणमळे, संगीता बजरंग रणमळे व जनाबाई रणमाळे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय तर कल्याणी खोसे, मनीषा रणमाळे, ज्योती हेमके यांना जिवंत पाण्याबाहेर काढण्यात यश मिळालं आहे.

 

First published: May 20, 2018, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading