Home /News /maharashtra /

100 % उपस्थिती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयात आता 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार सूट

100 % उपस्थिती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयात आता 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार सूट

राज्य सरकारनं मिशन बिग‍िन अगेन (Mission Begin Again) म्हणत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात दुसरीकडे राज्य सरकारनं मिशन बिग‍िन अगेन (Mission Begin Again) म्हणत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. काही शासकीय कार्यालयांत 100 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, अशा कार्यालयातील दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थितीत सूट देण्यात आली आहे. हेही वाचा...शरद पवार यांच्या एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप नेत्याची सडकून टीका सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती ही सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमकुवत असते, त्याचबरोबर वाहतुकीच्या सोयी सुविधांचा विचार करून लॉकडाऊनच्या काळात देखील काही कार्यलयांमध्ये टप्प्याटप्प्याने उपस्थितीची प्रमाण वाढवले जात असताना दिव्यांग कर्मचाऱ्यांना मात्र 21 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता. पुढील काळात अनलॉकच्या टप्प्यांमध्ये कर्मचारी उपस्थितीची टक्केवारी काही मर्यादेत वाढविण्यात आली. तसेच काही ठिकाणी रोटेशन पद्धतीने कामकाज केले जात होते. काही कार्यलयांमध्ये आता कर्मचारी उपस्थिती 100 टक्के अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु वाहतुकीच्या सुविधा मात्र आणखी पूर्णपणे सुरळीत नाहीत. या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाने 1000 टक्के उपस्थिती अनिवार्य असलेल्या कार्यालयांमध्येही दिव्यांग व्यक्तींना उपस्थितीतून सूट मिळवून दिली. या निर्णयाचं दिव्यांग कर्मचारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोर जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होणार नाही, याची काळजी त्या-त्या विभागानं घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Dhananjay munde

    पुढील बातम्या