नाशिक, 25 डिसेंबर : कोरोनाचा नवा विषाणू (Corona) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने सर्व जनतेला खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. पण, आपल्यासह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. नाशिकमधील (Nashik) पंढरपुरात सायकलवर गेलेल्या 24 जणांमुळे 41 गावकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावच्या 24 जणांनी सायकलने पंढरपूर गाठले होते. 14 डिसेंबर रोजी त्यांनी पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं होतं. पंढरपूरहुन दर्शन करून आल्यानंतर 24 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
टीम इंडियाचे निवड समिती अध्यक्ष झाल्यानंतर चेतन शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया
ही सर्व लोकं गावात आल्यानंतर अनेकांच्या संपर्कात आले होते. अनेक ठिकाणी या 24 जणांचा स्वागत आणि सत्कार समारंभही झाला. मात्र यातील काही जणांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यामुळे तपासणी केली असता हे सर्व पॉझिटिव्ह आढळून आले.धक्कादायक म्हणजे या 24 जणांच्या संपर्कात आल्याने तब्बल 41 गावकऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या घटनेने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण गाव पुढील 8 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
पुणेकरांच्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर पाणी, जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला नवा आदेश
गावात एकावेळी मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे पुन्हा कोरोनाची लाट पसरण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे गावातील गावकऱ्यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. महत्त्वाचे काम जर असेल तर घराबाहेर पडावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.