चंद्रपूर; 07 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur) जिवती या गावात झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्याला (farmer) लाखो रुपयांचे विज बिल आल्याने महावितरणचा (mseb) सावळा गोंधळ समोर आला आहे. जिवती (Chandrapur jivati) येथील केशवराव भिमू कोटनाके या शेतकऱ्याला एक लाख 380 रूपयाचे वीज बिल (electricity bill) आले आहे. कुडाच्या घरात एकही विद्युत उपकरण नाही, तरीही महावितरणने (mahavitran) पाठवलेले वीजबिल पाहून शेतकऱ्याला धक्का बसला. यावरून महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. येथे केशवराव भिमू कोटनाके यांचे कुडाचे छोटेसे घर आहे. घरात कोणतंही विद्युत उपकरण नाही. केवळ वीजेचे दोन बल्ब आहेत. तरीही महावितरणकडून या शेतकऱ्याला एका महिन्याचे वीज बिल तब्बल 1 लाख 380 रूपये पाठविण्यात आले आहे. वीजबिल पाहताच कोटनाके यांना मोठा धक्का बसला. त्वरीत त्यांनी महावितरण कार्यालय गाठले.
याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर रक्कम कमी केली. पण तरीही भरावयाची रक्कम हजारोंच्या घरात ठेवली. ४४ हजार २९० रुपये वीजबिल अधिकाऱ्यांनी भरायला सांगितले आहे. एवढी रक्कम भरायची कोठून हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. एकंदरीत पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महावितरणच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांची 477 कोटी 31 लाखांपर्यंत पोहोचलेल्या थकबाकीदारांविरुद्ध वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम ठरला!
चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षाच्या व गतवर्षीच्या एकूण मागणीपैकी २४ कोटी ८९ लाख घरगुती ग्राहकांकडून, ५ कोटी ९२ लाख रुपये व्यावसायिक ग्राहकांकडून, ६ कोटी ५१ लाख रुपये औद्योगिक ग्राहकांकडून, २ कोटी ५१ लाख ग्रामीण ग्राहकांकडून आहेत. आणि शहरी पाणीपुरवठा योजना. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी पथदिव्यांची 215 कोटी 69 लाख थकबाकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, चंद्रपूर chandrapur