मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Buldhana : धक्कादायक! उघड्यावर शौचास बसलेल्या चिमुकल्याचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके

Buldhana : धक्कादायक! उघड्यावर शौचास बसलेल्या चिमुकल्याचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके

बुलढाणा (buldhana) जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात अलीकडे मोकाट कुत्रे, डुक्कर, गाढव, गायी यांचा मुक्त संचार सुरू आहे.

बुलढाणा (buldhana) जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात अलीकडे मोकाट कुत्रे, डुक्कर, गाढव, गायी यांचा मुक्त संचार सुरू आहे.

बुलढाणा (buldhana) जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात अलीकडे मोकाट कुत्रे, डुक्कर, गाढव, गायी यांचा मुक्त संचार सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

बुलढाणा, 27 ऑगस्ट : बुलढाणा (buldhana) जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात अलीकडे मोकाट कुत्रे, डुक्कर, गाढव, गायी यांचा मुक्त संचार सुरू आहे. आज एका १० वर्षीय चिमुरड्यावर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात हा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान त्या चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या मुलावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मूळचा उत्तरप्रदेशातील असलेला इर्शाद शेख अस जखमी झालेल्या मुलाचं नाव असून तो बुलढाण्यातील एका मदरशात शिक्षण घेत आहे.

आपल्या तीन मित्रांसह तो उघडयावर शौचास बसलेला असताना पाच कुत्र्यानी त्याच्यावर हल्ला करून त्याचे संपूर्ण शरीरावर लचके तोडले. यावेळी त्याच्या मित्रांनी मदरशात माहिती दिल्यावर इर्शाद याला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Akola Crime : धक्कादायक! पोलिसांनी केस दाबण्यासाठी 1 लाख रुपये मागितल्याचा व्हिडीओ करत दोघांची आत्महत्या

बुलढाण्यात गुन्हेागारी वाढली

 बुलढाणा शहरात पैशाच्या वादातून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहे. (Buldhana Crime) एकावर बुलढाणा शहरात खाजगी रुग्णालयात तर दोन जणांना पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. पैशाच्या वादातून झालेल्या हल्ल्यानंतर या मारहाणीत हा चाकू हल्ला करण्यात आला आहे. यातील तीनही आरोपी पळून जात असताना बुलढाणा शहर पोलिसांनी विविध पथकाच्या मार्फत सिनेस्टाईल पद्धतीने मध्यरात्री या तीनही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा : कुटुंबाला मृत्यूनं गाठल! ३०० फूट दरीत कार कोसळून मोठी दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि. 20) रात्री 9च्या सुमारास बुलढाणा येथील गजानन टॉकीजजवळ विशाल पान सेंटरच्या शेजारी किराणा दुकान आहे. दुकानमालक अग्रवाल आणि समाधान मोरे याचे नातेवाईक बबन यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वादविवाद झाले. यात अग्रवाल यांच्याकडून संतोष पाटील (रा. जुनागाव) हे मध्ये पडले. परंतु समाधान मोरे, त्याचा भाचा रितेश आणि इतर दोन-तिन जणांनी संतोष पाटील यांना मारहाण केली. हे कळल्यानंतर पाटील यांचा तरुण मुलगा तुषार आपला मित्र सनी पवार याला घेऊन महावीर किराणावर पोहोचले. त्याठिकाणी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.

First published:

Tags: Buldhana news, Crime news