बेळगावात उद्घाटनाच्या आधी वाहून गेला 5कोटी खर्च करून बांधलेला पूल

बेळगावात उद्घाटनाच्या आधी वाहून गेला 5कोटी खर्च करून बांधलेला पूल

मलप्रभा नदीवरचा हा पूल आहे. 5 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधला. पण कंत्राटदारानं किती खराब काम केलं, याचा प्रत्यय येतोय.

  • Share this:

बेळगाव, 14 जून : आपल्या देशात पायाभूत सुविधांची काय अवस्था आहे, याचं प्रतिकात्मक चित्र आज सकाळपासून बेळगावमध्ये पहायला मिळतंय. बेळगावच्या बैलहोंगल तालुक्यात चक्क नव्या पुलाचा एक भाग उद्घाटनापूर्वीच वाहून गेला.

मलप्रभा नदीवरचा हा पूल आहे. 5 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधला. पण कंत्राटदारानं किती खराब काम केलं, याचा प्रत्यय येतोय. सुदैवानं जो भाग वाहून गेला, त्याच्यावर कुणीही नव्हतं, आणि त्यामुळे जीवितहानी झाली नाही.

First published: June 14, 2018, 11:55 AM IST

ताज्या बातम्या