मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीडमध्ये कोरोनाची चिंताजनक आकडेवारी, सुरू झालेल्या 40 शाळा बंद

बीडमध्ये कोरोनाची चिंताजनक आकडेवारी, सुरू झालेल्या 40 शाळा बंद

 बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 80 शाळा सुरू झाल्या. त्यानंतर स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन परवानगी मिळाली होती..

बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 80 शाळा सुरू झाल्या. त्यानंतर स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन परवानगी मिळाली होती..

बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 80 शाळा सुरू झाल्या. त्यानंतर स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन परवानगी मिळाली होती..

बीड, 06 ऑगस्ट : राज्यात एकीकडे कोरोनाची (maharashtra corona case) लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. पण बीड (beed) जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू झालेल्या 140 शाळांपैकी 40 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. महिना भरापूर्वीच जिल्ह्यातील 8 वी ते 10 वीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र, पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्यात आल्यात आहेत. तिसरा लाटेच्या अनुषंगाने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

15 जुलैपासून बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 80 शाळा सुरू झाल्या. त्यानंतर स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन, 30 शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, आता पुन्हा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना सुरु झालेल्या शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.

चांगलं आरोग्य हवं असेल तर या वेळी नका पिऊ पाणी; जास्त पाणीही ठरतं घातक

कोविडची परिस्थिती सुधारत असताना शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे पालकांनी देखील त्यासाठी तयारी दर्शवली होती. सलग शैक्षणिक दुसरं वर्ष ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. असं असताना पालकांनी देखील शाळा सुरू करण्यास संमती दर्शवून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलं, परंतु, पुन्हा कोरोनाची परिस्थिती पाहता भीती व्यक्त केली जात आहे.

पुढील आठवड्यामध्ये शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी

दरम्यान, राज्यातील अकरा जिल्ह्यांमधील व्यतिरिक्त इतर ठिकाणी रात्री दहा वाजेपर्यंत सर्व दैनंदिन व्यवहारांना मंजुरी देण्यात आली आहे. आता राज्य सरकार पुढील आठवड्यामध्ये शाळा (school) सुरू करावेत का याबाबत विचार करत आहे.

कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू, वर्षभरातली तिसरी घटना

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभाग (Department of School Education ) पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर एक बैठक आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी रुग्ण संख्या खूप कमी झाले आहे, अशा ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा वर्ग सुरू करावेत का? किंवाट इयत्ता नववी, दहावी या इयत्तेतील विद्यार्थी यांचे शालेय वर्ग सुरू करावेत का याबाबत चाचपणी करणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात आली असल्याने तिथली परिस्थिती देखील सुधारत आहे, अशा ठिकाणी काही प्रमाणात शाळा सुरू कराव्यात असा विचार शालेय शिक्षण विभागाचा आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, Beed news