VIDEO :औरंगाबादमध्ये उघड्या नाल्याच्या मुद्यावरून उपायुक्तांना नागरिकांनी लगावली कानशीलात

VIDEO :औरंगाबादमध्ये उघड्या नाल्याच्या मुद्यावरून उपायुक्तांना नागरिकांनी लगावली कानशीलात

औरंगाबादमध्ये उघड्या नाल्याच्या मुद्द्यावर उपायुक्त आणि नागरिकांत बाचाबाची झालीये. नागरिकांनी उपयुक्ताच्या कानशिलात लगावली.

  • Share this:

औरंगाबाद, 22 जून : औरंगाबादमध्ये  उघड्या नाल्याच्या मुद्द्यावर उपायुक्त आणि नागरिकांत बाचाबाची झालीये. नागरिकांनी  उपयुक्ताच्या कानशिलात लगावली.  बजरंग चौकात एका तरुणाचा नाल्यात पडून मृत्यू झालाय. आतापर्यंत दोन जणांचा नाल्यात पडून वाहून गेल्यानं जीव गेलाय.  अनेक वर्षाची मागणी असूनही काम होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आणि त्याचा फटका उपायुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना बसलाय.

काल झालेल्या पावसामुळे नाला भरून वाहत होता, आणि म्हणून चेतनला त्याचा अंदाज आला नाही. आणि तो त्या नाल्यात पडला. त्यात पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्याची बुलेटही पाण्यात वाहून गेली आणि यात चेतनचा मृत्यू झाला आहे.

गंभीर म्हणजे एवढ्या मोठ्या नाल्यांना संरक्षण भिंती नाहीत की कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स नाहीत. खरं तर हा पालिकेनं नागरिकांशी केलेला खेळच आहे.

पावसाळ्याआधी नाले बंद करणं, रस्त्यांवरचे खड्डे बुजवणे ही पालिकेची जबाबदारी असते. पण औरंगाबाद महापालिकेचा हलगर्जीपणा आता नागरिकांचे जीव घ्यायला लागला असंच म्हणायला हवं. पण आता या प्रकारांमुळे तरी महापालिका जागी होणार का हेच बघणं महत्त्वाचं आहे.

First published: June 22, 2018, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading