Home /News /maharashtra /

अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेनं घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला रुग्णाचा जीव

अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेनं घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला रुग्णाचा जीव

Ambulance fire Amravati: महाराष्ट्रातील अमरावती याठिकाणी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेनं पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. लेहगाववरून अमरावतीला जात असताना वाटेतचं रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतला आहे. यावेळी वाहनात चालकासोबतच एक रुग्णही होता.

पुढे वाचा ...
अमरावती, 12 एप्रिल: महाराष्ट्रातील अमरावती याठिकाणी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेनं पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. लेहगाववरून अमरावतीला जात असताना वाटेतचं रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतला आहे. यावेळी वाहनात चालकासोबतच एक रुग्णही होता. संबंधित रुग्णाला उपचारासाठी अमरावती याठिकाणी नेण्यात येतं होतं. पण वाटेतचं हा अपघात घडला आहे. पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. रुग्णवाहिकेला कशामुळे आग लागली याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. आज सकाळी अकरा वाजता MH 40-AT 0427 क्रमाकांची रुग्णवाहिका एका रुग्णाला घेऊन अमरावतीकडे जात होती. यावेळी रुग्णवाहिकेत अमोल तट्टे नावाचे रुग्ण होती. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लेहगाववरून अमरावतीला नेण्यात येत होतं. आज सकाळी अमरावतीतील पंचवटी चौक याठिकाणी आलं असता, चालकाना काहीतरी जळल्याचा वास आला. त्यामुळे रुग्णवाहिकेनं पेट घेतल्याचा संशय बळावला म्हणून त्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला उभी केली. चालकानं वाचवला रुग्णाचा जीव रस्त्याच्या बाजूला रुग्णवाहिका उभी करून पाहणी केली असता रुग्णवाहिकेनं पेट घेतल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. यानंतर चालकानं क्षणाचागही विलंब न करता रुग्णवाहिकेतील रुग्ण अमोल तट्टे यांना बाहेर काढलं. रुग्णाला बाहेर काढल्यानंतर पुढच्या काही क्षणातच संबंधित रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. रुग्णवाहिकेचा पुढील भाग जळून खाक झाला आहे. त्यानंतर वाहन चालक विक्की तंतरपाळे यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस तसेच युवक काँग्रेसचे मोर्शी अध्यक्ष पवन काळमेघ यांच्या काही कार्यकर्त्यांच्या मदतीनं ही आग विझवली आहे. हे ही वाचा-भयंकर! नागपुरात कोविड सेंटरला आग; चौघांचा मृत्यू विशेष म्हणजे संबंधित रुग्णवाहिका अवघी दोन महिने जुनी होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निधीतून 2 महिन्यापूर्वी या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या रुग्णवाहिकेला नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.  अमरावतीतील वाढत्या उष्णतेमुळं अशा घटना वाढत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Amravati, Fire

पुढील बातम्या