अमरावतीत डीजे बंद करण्यावरून तिवारी कुटुंबाला पोलिसांची मारहाण

अमरावतीत डीजे बंद करण्यावरून तिवारी कुटुंबाला पोलिसांची मारहाण

याची तक्रार करण्यासाठी आज या सगळ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तालय सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.

  • Share this:

23 आॅक्टोबर : अमरावतीत डीजे बंद करण्यावरून गाडगेनगरमध्ये पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप होतोय. बिल्डर राजू तिवारी यांच्या मुलाचा राहुलचा वाढदिवस होता, त्याच्या वाढदिवसानिमित्त फन लँड इथं डीजे लावण्यात आला होता. तिथे डीजे बंद करा सांगण्यासाठी आलेल्या 3 पोलिसांचा आणि तिवारी कुटुंबाच्या काहींचा वाद झाला. याचा राग मनात धरून पोलीस 40 पोलिसांना घेऊन परत आले. आणि त्यांनी म्हातारे, लहान मुलं न पाहता सगळ्यांना प्रचंड मारहाण केली.

या मारहाणीत 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मनीषा आहिरे यांचं 3 ठिकाणी हाड तुटलं आहे. लीना अहिरे या एअर होस्टेसलाही मारहाण करण्यात आलीये. याची तक्रार करण्यासाठी आज या सगळ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तालय सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आता या प्रकरणी आयुक्तांनी डीसीपी चिन्मय पंडित यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

First Published: Oct 23, 2017 03:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading