अमरावती, 13 मे: सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जवळ आलो आहोत; पण कुठेतरी संवाद हरवला आहे का याची जाणीव होत आहे. दरम्यान अमरावती (Amravati) जिल्ह्यातील नंदगावात मन हेलावून टाकणारी एक घटना घडली. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. चिठ्ठी लिहित तिने आत्महत्या केली आहे. (Amravati suicide case) एवढ्या लहान वयात टोकाचे पाऊल उचलण्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पण आपल्याला कुणी समजूनच घेत नाही म्हणन ही मुलगी निराश होती. अवघ्या 14 व्या वर्षीच तिने टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमरावतीच्या नंदगाव खंडेश्वरमध्ये 14 वर्षीय चिमुकलीने गळफास लावून घेतला. (suicide at nandgaon amravai) मला कुणी समजून घेत नाही असं लिहून तिने स्वतःला कायमचं संपविलं. ओंकारखेडा परिसरात ही किशोरवयीन मुलगी राहायची. आई वडील घरात कुणीही नसताना तिने राहत्या घरात गळफास लावला. आई वडील घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
तात्काळ तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं. डॉक्टरांनी मात्र तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसानी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. तर या संदर्भात पोलिसांचा तपास (police report) सुरू आहे. दरम्यान सुसाईड नोटमध्ये नेमके काय लिहले आहे हे पोलीस तपासानंतरच समजेल.
अमरावतीत आत्महत्येच्या प्रमाणात वाढ
अमरावती जिल्ह्यात 2021 या साली सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ कर्जबाजारीपणाच कारणीभूत नाही, तर काही प्रकरणांमध्ये विविध आजार, कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता, बेरोजगारी व गरिबी आदी घटकही जबाबदार असल्याचे निरीक्षण आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना गरजू शेतकऱ्यांना मिळत नाहीत व शेतकरी आत्महत्या होऊ नयेत, याकरिता वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरुपी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा : महागाईचा भडका! 8 वर्षात सर्वाधिक वाढली महागाई; भाजी, डाळ, वीज सर्वांचेच दर कडाडले
राज्यातील शेतकरी आत्महत्याप्रवण 14 जिल्ह्यांमध्ये सन 2021मध्ये सर्वाधिक 356 शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. अस्मानी अन् सुल्तानी संकटाचे हे सर्व शेतकरी बळी ठरले आहेत. यासाठी शासन - प्रशासनाचे प्रयत्न थिटे पडत असल्याचे वास्तव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Suicide, Suicide news