अंबरनाथ: गुंडांनी वर्दीवरच टाकला हात, स्टेशन बाहेर पोलिसावर तलवारीने प्राणघातक हल्ला

अंबरनाथ: गुंडांनी वर्दीवरच टाकला हात, स्टेशन बाहेर पोलिसावर तलवारीने प्राणघातक हल्ला

आरोपींची ओळख पटली नसली तरी ज्या पद्धतीने शस्त्रांनी त्यांनी हल्ला केला त्यावरून ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

अंबरनाथ 23 ऑक्टोबर: कोरोना काळात आघाडीवर लढत नागरीकांचं रक्षण करणाऱ्या पोलिसावरच शुक्रवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. अंबरनाथ मधली ही घटना असून आरोपींनी पोलीस स्टेशनच्या बाहेरच हा हल्ल्याची केल्याची माहिती आहे. बाळा चव्हाण असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. चव्हाण हे सेंट्रल पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

बाळा चव्हाण असं या घटनेत जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव असून ते उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. चव्हाण हे शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून उल्हासनगरहून बदलापूरला आपल्या घरी जायला निघाले होते. त्यावेळी अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली असताना एका कारमध्ये चार रेकॉर्डवरील गुन्हेगार रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसलेले त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी या चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता या चौघांनी गाडीतून उतरून त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केले.

यानंतर कारच्या मागे असलेल्या एका रिक्षाचालकाला तलवारीचा धाक दाखवत त्याची रिक्षा घेऊन हे चौघे पसार झाले. या आरोपींनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गाडी फोडली, तिथून एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर त्यांनी हल्ला केला. तिथून उल्हासनगरच्या शिवाजी चौकात एक लाल रंगाच्या आय ट्वेन्टी गाडीची काच फोडत चालकाचं अपहरण करून ते अंबरनाथला आले.

संतापजनक! मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव, पतीने केली मारहाण

आणि त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचारी बाळा चव्हाण यांच्यावर हल्ला केला. या आरोपींवर आत्तापर्यंत आतापर्यंत सहा ते सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या चौघांच्याही शोधासाठी अंबरनाथ पोलिसांनी अनेक पथके रवाना केली असून लवकरात लवकर या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 23, 2020, 9:59 PM IST
Tags: police

ताज्या बातम्या